राष्ट्रवादी रिक्षा युनियन तर्फे २४ जानेवारी रोजी आंदोलन
सत्यप्रती न्यूज - सांगली | दि.२० /१/२०२३
राष्ट्रवादी रिक्षा युनियन तर्फे चिंतामण नगर बस स्टॉप ते सांगली आरटीओ ऑफिस कार्यालयापर्यंत साष्टांग दंडवत आंदोलन २४ जानेवारी रोजी राष्ट्रवादी रिक्षा युनियन सांगली रिक्षा चालक यांनी चिंतामणी नगर बस स्टॉप ते सांगली आरटीओ ऑफिस कार्यालय साष्टांग दंडवत आंदोलन करणार आहेत.
सर्व रिक्षा चालक व मालक या आंदोलनात सहभाग होऊन सहकार्य करावे ही विनंती राष्ट्रवादी रिक्षा युनियन अध्यक्ष रामचंद्र युवराज पाटील यांनी बोलताना सांगितले.
सर्व रिक्षा चालक मालक याने एकजुटीने यावे असे म्हणत रामभाऊ पाटील यांनी रिक्षा एकजुटीने येऊन सांगली आरटीओ ऑफिस नूतनीकरण अतिरिक्त शुल्क बंद करीत नाही या कृतीचा निषेध म्हणून रिक्षा चालकांना न्याय मिळावा यासाठी साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे.
सर्व रिक्षा चालक मालक यांनी सहभाग घेऊन सहकार्य करावे ही विनंती सांगली जिल्हाध्यक्ष रामचंद्र युवराज पाटील यांनी बोलताना सांगितले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.