Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

गावाच्या विकासासाठी एक दिलाने कामे करा - आ. डॉ. विश्‍वजित कदम

गावाच्या विकासासाठी एक दिलाने कामे करा - आ. डॉ .  विश्‍वजित  कदम



जनता न्यूज l दि.१७/१/२०२३

गेल्या ५० वर्षापासून चोपडेवाडी गाव कदम कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत चोपडेवाडीने उच्चांकी मतदान करून मतदारसंघांमध्ये विक्रम नोंदविला आहे. गावाच्या विकासासाठी कदम परिवाराने कधीच निधी कमी पडू दिला नाही. विकास कामे गावात पूर्ण होत आहेत. भविष्यात महापुरातून गावातील ग्रामस्थांना बाहेर पडण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल. 

गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने कामे केली पाहिजेत असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी, सहकार, मराठी भाषा राज्यमंत्री व भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्‍वजित कदम यांनी केले.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी डॉ. विश्वजीत कदम हे बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक व पलूस तालुक्याचे समन्वयक मा. महेंद्रआप्पा लाड,डॉ. संतोष माने, महादेव मोरे,दिलीप माने, सुरेश माने, सचिन माने, तुकाराम माने यांच्या सहित लोकनियुक्त सरपंच प्रशांत माने, उपसरपंच सुप्रिया माने, सदस्य सागर माने, सौ. हर्षाताई माने,अक्षय मोरे, सौ. सुषमा मोरे, प्रकाश माने, सौ.प्रियंका माने आदी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच प्रशांत माने, उपसरपंच सुप्रिया माने यांच्या सहित विजयी झालेल्या सदस्याचा शाल, श्रीफळ, फेटा देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कारा नतंर डॉ. विश्वजीत कदम पुढे बोलताना म्हणाले चोपडेवाडीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे. साहेबांचे आशीर्वाद चोपडेवाडीतील सर्वांच्या पाठीशी आहेत. गावाच्या सम्रग विकासासाठी आ.मोहनराव(दादा) कदम, महेंद्रआप्पा लाड व माझे सर्वतोपरी सहकार्य असेल.

अशी ग्वाही देत उच्चांकी मते काँग्रेसला देण्याची वैभवशाली परंपरा चोपडेवाडीने याही पुढे कायम जोपासावीअसे आवाहन डॉ.विश्‍वजित कदम यांनी यावेळी केले.

महेंद्रआप्पा लाड म्हणाले नवनिर्वाचित सदस्यांनी शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत प्रामाणिकपणे राबवाव्यात. 

यावेळी डॉ. संतोष माने म्हणाले डॉ.विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली अनेक कोटींची विकास कामे पूर्ण झालेली आहेत. महापूर अथवा कोरोना असो या परिस्थितीत बाळासाहेबांनी अनमोल अशी मदत चोपडेवाडीला केलेली आहे. भविष्यामध्ये आमदार डॉ. विश्वजीत कदम साहेब यांचे कार्य अधिक जोमाने गावामध्ये करण्यासाठी सर्वजण सदैव तत्पर राहतील. आदर्श गावाच्या निर्मिती साठी नवनिर्वाचित सरपंच व सर्व सदस्य गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, नेते, यांना बरोबर घेऊन कार्य करतील. राजकारणामध्ये जय पराजय नेहमीच परिस्थिती व वेळेनुसार होत असतो. मात्र नेतृत्वाने दाखविला विश्वास हीच खरी गावाची श्रीमंती असते. भविष्यात होऊ घातलेल्या पंचायती समिती, जिल्हा परिषद तसेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उच्चांकी मताची परंपरा कायम जोपासण्यासाठी सर्वजण  डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील आहेत. यावेळी दिलीप माने, लोकनेते सरपंच प्रशांत माने यांनीही मनोगते व्यक्त केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.