Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

KK-Foundation

 

 REG.NO: MAH/150/2015 

( Since : 2010 )

-|| कृष्णाकाठ सोशल फौंडेशन, भिलवडी-सांगली ||-

कृष्णाकाठावरील  युवाशक्‍तीचा विधायक कार्यासाठी वापर करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधणे, या उद्देशाने ‘कृष्णाकाठ सोशल फौंडेशन , भिलवडी - सांगली ’ची स्थापना करण्यात आली. आपल्या समस्यांवर आपणच एकत्र येऊन उपाय शोधले पाहिजेत, आपल्या प्रगतीसाठी आपणच सुरुवात केली पाहिजे, विधायक कार्याचा आरंभ केला पाहिजे, या भावनेतून  काही युवकांनी एकत्र येऊन काम सुरू केले. शिक्षण, तंत्रज्ञान, रोजगार, प्रशासन, पर्यावरण यासंदर्भात आजच्या युवापिढीसमोरील आव्हाने लक्षात घेत, समाजाच्या सर्व कृतिशील घटकांना एकत्र आणून विधायक उपक्रमांची आखणी ‘कृष्णाकाठ सोशल फौंडेशन’ करीत आहे.

 कृष्णाकाठ सोशल फौंडेशन , भिलवडी - सांगली हि एक सामाजिक हित जोपासण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने २०११ ला हि संस्था काही जणांनी एकत्रित येऊन सुरू केली. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, 

हा उदात्त हेतू समोर ठेवून  "कृष्णाकाठ सोशल फौंडेशन " चे कार्य सुरु झाले. “देणे समाजाचे” खरचं फारच मोठा शब्द आहे. पण आपल्यापैकी खूपजणांना असे वाटते की दुसर्यालसाठी आपल्या परीने जेवढे जमेल तेवढे काहीतरी तरी करावे. या साठी "कृष्णाकाठ सोशल फौंडेशन " गेली काही वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य आणि शेती विषयक कार्यक्रम किंवा मदत करण्याचे कार्य करत आहे.

मित्रांनो, आपण मराठी संस्कृती जतन करतो, ती पुढच्या पिढीकडे सुपूर्द करतो. पण असे करतानाच सामाजिक जाणीवांचे भान ठेवणे आणि समाजाचे एक जे देणे आपण लागतो ते फेडणे तेवढेच महत्वाचे आहे असे आम्ही मानतो. याच विचारातून प्रेरित होऊन आम्ही सर्व समविचारी एकत्रित आलो आपल्या सेवेसाठी आणि समाजसेवेसाठी. तर मित्रांनो आमच्या मनात असलेल्या काही योजना आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत. त्या पूर्ण करण्यासाठी अर्थातचं तुमच्या संपूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे आणि तुम्ही ते करालचं याची संपूर्ण खात्री आहे.


१. गोर-गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणे.

२. आरोग्य विषयक शिबीर राबवणे.

३. महीलांचे व्यक्तिमत्व व उद्योग मार्गदर्शन शिबीर भरवणे.

४. तरुणांसाठी करीअर मार्गदर्शन करणे.

५. विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणे.

६. अनाथ आश्रम व वृद्धाश्रम यांना मदत करणे.

७. गरजू लोकांना सामाजिक मदत करणे.

८. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे.

९. सार्वजनिक सण व उत्सवात मदत करणे.

१०. दुष्काळी भागात मदत करणे.


=======================================================================

आपणालाही काही समाजाचे ऋण फेडायचे असतील तर आपण आम्हाला पुढील स्वरुपात मदत करू शकता. देणगी, कपडे, धान्य, शैक्षणिक साहित्य,  व इतर. अशा कार्याने मनामनात देशप्रेम रुजवणे हाच उद्देश समोर ठेवून " कृष्णाकाठ सोशल फौंडेशन , भिलवडी - सांगली"  कार्य करीत आहे.

संस्थापक -अध्यक्ष  : अमोल वंडे 
amolvande@live.com / +91 9890 546 909
For Latest Update : fb.com/bhilawadi

-------------
Contribute
-------------

RBL Bank Ltd.
Branch : Bhilawadi

Account Number : 409000446841     IFSC Code :   RATN0000014
Google /Phone Pay : +91 9890 546 909

=======================================================================

 










➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.