Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

History

 

भिलवडी

           भिलवडी हे नाव भिल्ल-वाडी या शब्दाचे अपभ्रंश  रूप आहे.फार प्राचीन काळी येथे भिल्ल लोकांची वस्ती होतीम्हणून या गावास भिलवडी हे नावमिळाले. भिलवडी आणि बारा वाड्यांचा प्रदेश कृष्णा नदीच्या सानिध्याने समृद्ध झालाआहे. गावात पूर्वीपासून जातीय सलोखा राखला जातो.येथे सर्वधर्मीय लोकगुण्यागोविंदाने राहतात. सर्व सण-उत्सव अतिशय आनंदाने साजरे केले जातात.

          भिलवडी ग्रामपंचायतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळातइ.स. १९२२ मध्ये झाली. इ.स.१९६६ पर्यंत १२ वाड्यांचा कारभार भिलवडी ग्रामपंचायतीमार्फत चालत असे. सर्वच क्षेत्रात भिलवडीने उत्कृष्ठ प्रगती साध्य केली आहे.   

भिलवडी हे पलूस तालुक्यातील सामाजिक आणि शैक्षणिक परंपरालाभलेले व नैसर्गिक दृष्टया समृद्ध  असलेल्या कृष्णाकाठी वसलेले एक प्रगत गाव आहे.सांगली जिल्ह्याच्या पटलावर भिलवडीने स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे.       

                  
  कृष्णानदी वरील घाट

   हा कृष्णानदी वरील घाट महाराष्ट्रात प्रसिद्ध असून इतका मोठा व सोयीस्कर घाट कृष्णेच्याउगमापासून मुखापर्यंत कुठेही नाही .हे चीर काळाचे स्मारक इ.स. १७७९ मध्येकै.परशुराम पटवर्धन यांनी उभारले .

 घाटाची रचना :   
                  घाटाच्या वरच्या बाजूस ९ ओवऱ्या बांधलेल्या असूनप्रत्येक ओवरी वर मेहरपी कमान आहे .ओवारया वर सहा खणांची एक इमारत चौघड्या करिताबांधली आहे घाटास एका खाली एक असे १४-१४ बुरुज आहेत  पूर्व बाजूच्या प्रत्येकबुरुजावर  माशाचे तर पश्चिमेकडील प्रत्येक बुरुजावर कांसवाचे चित्र कोरले आहे .घाटास ४२ पायऱ्या असून त्या नदीच्या मध्य प्रवाहापर्यंत नेल्या आहेत ,त्यामुळे घाटव प्रवाह यांचा संबंध बाराही महिने कायम राहतो .कितीही मोठा पूर आला तरी घाटावर गाळसाचत नाही .       

        अगदी तळाच्या  चौथऱ्या वर महादेवाचे अष्टपैलू देवालय आहेघाट बांधता वेळी तिथे स्नानाकरिता कुंडाच ठेवले होते पण त्यात माणसे व जनावरे पडूनअपघात होऊ  लागल्याने ते झाकून त्यावर देऊळ बांधले गेले आहे.        

                 इ.स.१९१४ च्या महापुरात  एक ओवरी भंग पावली आहेगावास तटबंधी होती त्या वेळेस गावाकडील बाजून मधल्या ओवरीत उतरण्याकरिता दगडीपायऱ्यांची प्रशस्त वाट होती पण १८५० च्या दरम्यान दगडी भिंत बांधून ती बंद केलीआहे.             घाटाची लांबी साधारणत: ४२५ फुट आणी रुंदी १०२ फुट आहे. ओवरी वरउभा राहून घाटाकडे नजर टाकल्यास तो सपाट भासतोघाटाची गावाकडील उंची १६ फुट आणीनदी प्रवाहातील उंची ४ फुट आहे ..गाव नदीच्या वळणावर असल्यामुळे महापुरात पाण्याचाप्रवाह गावाच्या दिशेने वाहतो पण त्या प्रवाह रोखून धरण्याचे काम घाट व ओवऱ्या गेली२३३ वर्षाहून ही अधिक काळ करीत आहेत .या निर्जीव उपकर्त्या विषयी कृतज्ञता दाखूवूनहा ऐतिहासिक वारसा काळजीपूर्वक जपण्याची गरज आहे ......!   

          भुवनेश्वरवाडी,भिलवडी

भुवनेश्वरवाडीस भुवनेश्वरी देवीचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे .देवीची मूर्ति अष्ठभुजा असून तिचे स्वरूप उग्र आहे ,परगावच्या पुष्कळ लोकांचे भुवनेश्वरी कुलदैवत आहे .इथे दरवर्षी नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने व मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोस्थानिक गुरव समाजाचे लोकच पुजारी म्हणून देवीची सेवा करतात.   

इतिहास :

      श्रीमत जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांच्या समकाली श्रीधाराचार्य आराध्ये नावाचे एक पुरुष मांझरा व गोदावरी यांचे संगमावर राहत होते . त्यावेळी नद्यांना महापूर येऊन गाव वाहून जाऊ लागले .म्हणून त्यांचा मुलगा जगदाचार्य व ३० लोक महापुरातून पोहून अलीकडे आले व त्यापैकी जगदाचार्य आराध्ये व १० लोक तेथून निघून थेट भिल्लाष्टक” उर्फ भिलवडी गावी प्रसिद्ध असलेल्या भुवनेश्वरी जवळ इ.स ५१३ मध्ये येऊन राहिले. 

 

श्री .म्हसोबा देवस्थान,   अंकलखोप जि.सांगली

        अंकलखोपचे नाव दोन देवावरून पडले. एक अंकलेश्वर आणि दुसरे खोपेश्वर. म्हसोबा हेअंकलखोपचे ग्रामदैवत आहे. म्हसोबाचे देऊळ सर्व बाजूने चिंचेच्या झाडांनी व्यापलेलेआहे. त्यामुळे त्याला म्हसोबाची बाग म्हणतात.   गावाला जत्रेची खूप जुनी परंपराआहे.  

          
म्हसोबाच्या जत्रेला बोकड आणि कोंबडे कापले जाते.  गावचीम्हसोबाची जत्रा ५ दिवसांची असते. त्या दिवसांचे महत्त्व खाली लिहिले आहे
१.  पहिला दिवस मानाचा बकरा  
२.   दुसरा दिवस – मानाचा गाडा
 
३.  तिसरादिवस – बाहेर गावाहून आलेल्या लोकासाठी बोकड/कोंबडा कापणे . पण हा दिवस कायम असतोचअसे नाही. कधी कधी फक्त चार दिवसांची जत्रा असते.
 
४.   चौथा दिवस. – गावनैवेद्य.
 
५.  पाचवा दिवस – पालखी आणि सासन काठ्या (राम नवमी) नक्षत्र प्रमाणेवरचे दिवस गुरव लोक ठरवतात मानाचा बकरा गावच्या पाटलांचामानाचा गाडा (म्हणजेबैलगाडी) गावच्या मानाच्या गायकवाडाचा. ते मानाचे बकरे कापल्या शिवाय कोणाचा हिबकरा कापला जात नाही  आणि मानाचा गाडा निघाल्याशीवाय बाकीचे गाडे निघायला परवानगीनाही

 
            कविवर्य संभाजी आण्णांचे चरित्र

कविवर्य संभाजी आण्णांचा जन्म कृष्णाकाठी भिलवडी गावी इ.स.१७०७ श्रावण महिन्यात गोकुळ अष्टमीस  कोष्टी घराण्यात झाला .वडिलांचे नाव कोणाप्पा व आईचे नाव सत्यवा होते . त्यांच्या पोटी शिवा ,संभा आणि बाबा अशी तीन देवांचा अवतार असलेले भावंडे जन्माला आलीसंभाला लहानपणीच शंकराची पुजा करण्याचा छंद लागला.

 

संभाजी आण्णा नेहमी अध्यात्मिक ज्ञान तत्वज्ञान यांच्यावर आभ्यास करीत . महाराष्ट्राची सांस्कृतिक कला असलेल्या लावणीचा पाया भेदिक आहे व त्यातून त्यांना अश्या भेदिक कला ,गाण्याचा छंद लागला त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली .त्यावेळी त्यांना राजू तांबोळी जोडीदार मिळाला या दोघांना मिळून काव्य रचना केली .तासगाव येथील बापूजी पाटील यांचे शिष्य श्री.रामानारू (गाव : मणेराजुरी ) यांची गुरुदक्षिणा घेऊन गाण्याचा फड उभा केला आणि देशभर लौकिक मिळवला . संभा व राजू यांनी मिळून    कवित्व केले त्या कवित्वला त्यांनी संभूराजू”असे नाव दिले.  संभाजी आण्णांचे अध्यात्मिक ज्ञान अपार होते ,शेवटी शके १८१० वैशाख शुद्ध नवमी ला वर रविवार या तिथी वर देह ठेवला, दरवर्षी वैशाख शुद्ध नवमीला ,संभाजी अण्णांची पुण्यतिथी सोहळा भिलवडी  येथे साजरा केला जातो


 
    श्री दत्त क्षेत्र औदुंबर जि.सांगली

    श्रीनृसिंह सरस्वतींच्या चातुर्मास-निवासामुळे हे क्षेत्र निर्माण झाले आहे.भिलवडी च्या रेल्वे स्टेशनपासून ६ कि.मी. अंतरावर  कृष्णेच्या काठी हे ठिकाण आहे.

औंदुंबरांच्या दाट शीतल छायेत शके १३४४च्या सुमारास श्रीनृसिंहसरस्वतींनी चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्तकरून दिले. येथील कृष्णेचा घाट शांत आणि प्रशस्त आहे. या घाटावरच दत्तपादुकांचेमंदिर आहे. ज्या घाटावर दत्त पादुकामंदिर आहेतो घाट येथील ब्रह्मानंदस्वामींचेशिष्य सहजानंदस्वामी यांनी बांधविला आहे.

       पावसाळ्यांत श्रींच्या पादुकाकृष्णेच्या महापुरांत बुडून जातात आणि त्यामुळें नित्योपासना व दर्शन अशक्य होऊनबसते. ही अडचण दूर करण्यासाठीं सन १९२६मध्ये उंच जागीं एक देवघर बांधले आहे.पावसाळ्यांत देव तेथे नेतात आणि तेथेच पूजा-अर्चा होते. श्रेत्रांतीलनित्यनैमित्तिक उपासनेसाठी अनेक सरदार-संस्‍थानिकांकडून दाने व इनामे मिळाली आहेत.

    या क्षेत्रांत ब्रह्मानंदस्वामींचा मठ आहे. हे सत्यपुरुष सन १८२६च्या सुमारासगिरनारहून औदुंबर क्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली.येथील शांतप्रसन्न आणि पवित्र वातावरणांत त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्तझाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली.





               

     


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.