Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल

ll कृष्णाकाठ न्यूज ll

बाळासाहेबांचा दिग्विजय :पलूस-कडेगावच्या सुवर्ण भविष्याची चाहूल

-अमोल वंडे/ भिलवडी -९८९० ५४६ ९०९

 साहेबांचे आशीर्वाद...स्वत:चे निर्विवाद कर्तुत्व...जनतेचा विश्वास” या जोरावर आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी प्राप्त केलेले ऐतिहासिक यश भावी काळातील त्यांच्या व मतदारसंघाच्या प्रवासाला निश्चित अशी दिशा देणार ठरेल यात शंका नाही..प्रथमत:त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन..!
 पलूस कडेगावचे भाग्यविधाते, प्रेरणास्थान डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्या स्वप्नपूर्ती साठी कार्यरत असलेले आपले बाळासाहेब अर्थात डॉ.विश्वजीत पतंगराव कदम हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला आता नवीन नाही...पण २०१८ ची  बिनविरोध आमदारकीची किमया असो किंवा २०१९ चा ऐतिहासिक...दैदिप्यमान...दिग्विजय एक बाब मात्र बाळासाहेबांना वैशिष्ट्यपूर्ण ठरविते ती म्हणजे त्यांची समाजकारणावरील ,राजकारणावरील,संघटनेवरील प्रभुत्व.

१९९९ ला वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी राजकारणात सक्रीय सहभाग घेतल्यापासून संस्था,पक्ष,संघटना यामधील विविध जबाबद-या सांभाळत असताना आपल्या  चौफेर कार्यक्षमतेचा ठसा बाळासाहेबांनी प्रत्येक जागी उमटवला.युवक काँग्रेस च्या माध्यमातून राज्यभरातील युवकांचे संघटन असो किंवा जनसंपर्कातून विविध प्रश्नांवर आवाज उठवायचा असो बाळासाहेब नेहमीच अग्रभागी राहिले.

२०१८ ला साहेबांच्या अचानक जाण्याने बसलेल्या धक्यातून जनतेला सावरून मी तुमच्या साठी अविरत कार्यरत असेन हा विश्वास देणारे बाळासाहेब जनतेच्या मनामनात नवा विश्वास रुजवू लागले...बाळासाहेबांनी आमदारकीच्या काळात आपल्या निर्भीड प्रश्नांच्या जोरावर विधानसभा गाजवली.२०१९ चा पावसाळा तर कृष्णाकाठावर महापुराचे महाप्रचंड संकट घेऊन आला..आणि साहेबांनंतर...बाळासाहेबांनी जे अहोरात्र मदतकार्य राबविले त्याने तर जनतेच्या मनामनात..ह्दयात बाळासाहेबांनी तहह्यात अढळ स्थान मिळवले.या सर्व पार्श्वभूमीवर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बाळासाहेबांना १ लाख ६१ हजार हून अधिकचे विक्रमी मताधिक्य देत जनतेने आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा विश्वास दृढ केला.

एकच खंत आज मनात आहे को,हे यश साजरे करायला साहेब हवे होते..आदरणीय आ.श्री.मोहनराव दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, बाळासाहेब येणा-या काळात आपल्या कार्यकौशल्याच्या जोरावर मतदारसंघ राज्यात अग्रेसर राखतीलच यात शंका नाही..मात्र राज्याच्या नेतृत्वाची संधी त्यांना मिळावी या करीत अशाच प्रकारे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले आद्य कर्तव्य आहे..हि त्यांची सुरवात पलूस-कडेगाव मध्ये साहेबांनी रचलेल्या विकासाच्या पाया वर भविष्यात सुवर्ण कळस चढविल्या शिवाय राहणार नाही हि खात्री आहे...त्यांच्या भावी प्रवासासाठी शत:कोटी शुभेच्छा..!

 ➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.