उत्सवांचे बाजारीकरण आणी हरवलेली सात्विकता
"आदिशक्ती तू आदिमाया" असं म्हणत नवरात्री मधे स्त्रीशक्तीची पूजा केली जाते..
उत्सवांचे मूळ उद्देश समाजामधे जागृती होऊन विधायक विचार वाढीस लागावा हाच असतो.
उत्सवांचे मूळ उद्देश समाजामधे जागृती होऊन विधायक विचार वाढीस लागावा हाच असतो.
मात्र या देवीच्या विसर्जन मिरवणूकीत जेंव्हा "सखू गेली बाजारला" , "पप्पी दे पारुला" अश्या अश्लील गाण्यांवर तरुणाई विभत्स नाचत असताना दिसते तेंव्हा संवेदनशील मनाला हा समाज कुठल्या दिशेने चाललाय हा प्रश्न पडल्या शिवाय रहात नाही.
वाढलेली लोकसंख्या त्यातच कागदी शिक्षण, व्यसनांच्या आहारी गेलेली दिशाहीन तरुणाई, कोणतीही वैचारीक बैठक नसलेली ही गर्दी नक्की समाजाच्या मुख्य प्रवाहात कशी येणार हा खरा प्रश्न आहे.
गाव,शहर बदलले तरी कमी अधिक फरकाने हेच चित्र सर्वत्र आहे यात शंका नाही. सात्विक रित्या सण उत्सव आजही खूप ठिकाणी साजरे होतात पण हे विभित्स चित्र दिसनार असेल तर त्या देवीच्या ही मनातही आपण या प्रवृत्तीचा संहार करावा हेही नक्की येत असेल.
या पडद्यासमोरचे चित्र असले तरी तरूणाई स्वैर का होतेय या पाठीमागील ख-या कारणांचा शोध घेणं गरजेचं आहे. त्यांच्या क्रयशक्तीचा विधायक कामांसाठी कुटुंबासाठी , समाजासाठी होण्यासाठी वैचारीक परिवर्तन घडविण्याचे व दिशा देण्याचे काम समाजातील मान्यवर जबाबदार अनुभवी व्यक्तींचे आहे हे मात्र निश्चित.
हे झालं माझं मत , आपल्याला काय वाटतं जरुर सांगा...!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.