KrushnaKath News

सांगली l महाराष्ट्रासह - जगभरातील सकारात्मक न्यूज व माहितीचे अग्रगण्य व्यासपीठ..!

भिलवडीत ५ ऑक्टोबर रोजी व्यायाम-कोरोना जनजागृती रॅली

भिलवडीत व्यायाम-कोरोना जनजागृती रॅली - सहभागी व्हा आवाहन

भिलवडी l दि.४/१०/२०२०
ll मिले सुर मेरा तुम्हारा.. तो सुर बने हमारा ll

कोरोना हा आता आपल्या जीवनातला एक अविभाज्य भाग होत चाललाय.. होणार आहे..यात शंका नाही.

कोरोना होऊ नये किंवा झाला तरी त्यातून मुक्त व्हावं यासाठी डॉक्टरांसह बरीच मंडळी आपल्यासाठी काम करताहेत. 

मास्क,सोशल डिस्टन्ससिंग जेवढं महत्त्वाचं आहे.. तेवढंच सकस आहार आणि रोजच्या रोज व्यायामही महत्त्वाचा आहे.या व्यायामाचं महत्त्व सांगण्यासाठी सोमवार दि.5 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 5.30 वाजता जनजागृती रॅली आयोजित केली आहे.

या जनजागरण रॅलीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत. 

उद्योजक गिरीश चितळे,योगप्रशिक्षक शशिकांत भागवत,जलतरणप्रशिक्षक महेश पाटील,व्यापारी प्रतिनिधी सुबोध वाळवेकर,सचिन नावडे,ज्येष्ठ नागरिक संघटनेचे राजाराम माने,कोरोना काळातले धाडसी डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी, कोरोना योद्धा प्रतिनिधी मुन्ना पट्टेकरी,कोरोना मुक्त झालेले महेश पुजारी,क्रिकेट प्रशिक्षक विजय वावरे,प्रगतशील शेतकरी शशिकांत यादव,कराटे प्रशिक्षक दिलावर डांगे,महिलांच्या वतीने रतन मोकाशी,कयाकिंगपटू गजानन नरळे,फुटबॉलपटू अवधूत पाटील,क्रीडाशिक्षक सूरज पाटील,जिम ओनर्सतर्फे सुदीप चौगुले,युवा दिग्दर्शक प्रफुल्ल कांबळे,नोकरदारांच्या वतीने अमोल वंडे,आपत्ती व्यवस्थापन समिती आजी-माजी सैनिक संघटना यांचे प्रतिनिधी, आमचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत.

 कोरोना होऊच नये म्हणून किंवा झाला तर आपली मानसिक शक्ती कशी वाढवायची.. व्यायाम कसा करायचा याबाबत भिलवडीच्या प्रत्येक चौकांमध्ये ही मंडळी गावकऱ्यांबरोबर संवाद साधणार आहेत.

कृपया आपण सकाळी 5.30 वाजता ग्रामपंचायतीसमोर उपस्थित राहावे ही नम्र विनंती. येताना आपण लोअर-टीशर्टमध्ये यावे आणि सोशल डिस्टन्ससिंग  पाळून आपण ही रॅली आयोजित करणार आहोत याची नोंद घ्यावी.

अधिक माहिती करिता संपर्क : मा.दीपक पाटील - +91 7798778222
Powered by Blogger.