बापूसाहेब येसुगडे हे फक्त नाव नाही पर्व आहे..आज एक क्रांतिसूर्य हरपला..!
पलूस - दि.२/१०/२०२०
बापूसाहेब येसुगडे हे फक्त नावच पुरेसं आहे पलूस आणि परिसराला एक नवी आशा दाखवली आणि ती केवळ दाखवली नाही तर रयत विकास आघाडीच्या माध्यमातून सत्यात उतरवली आणि सामान्यांच्या काळजात घर करून राहिलेले बापूसाहेब येसुगडे संग्राम उद्योग समूहाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनावश्यक उत्कर्षासाठी अविरत झटत होते.
पूर स्थितीत त्यांनी हजारो पूर बाधित नागरिकांना स्वतः भोजनाची व्यवस्था तर केलीच शिवाय माझ्या माणसांना कसलीही अडचण येणार नाही यासाठी सर्व ती सोय केली. तसेच राहण्याची व्यवस्था हि केली हे करत असताना त्यांनी पुरबाधित नागरिकांना कधीही हे वाटू दिले नाही की ते आश्रयीत आहे त्यांनी आपल्या जिवाभावाची माणसे अडचणीत आहेत आणि त्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे या भावनेतून निस्वार्थीपणे मदत करत राहिले. यावरच ते थांबले नाहीत पूर पट्टयात अविरत सेवा सुरूच ठेवून स्वच्छता, औषध फवारणी करून नागरिकांना राहण्यायोग्य घरे करणेस सर्व ती मदत केली. संग्राम उद्योगाच्या माध्यमातून अनेक गरजूंना त्यांनी आर्थिक मदत तर केलीच शिवाय त्यांच्या अनुभवाच्या आणि आपुलकीच्या सल्ल्याने अनेक उद्योजक पलूस परिसरात आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आपली उन्नती साधत आहेत. औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या हाताला काम मिळाले अनेक घरे उभी राहिली त्यांचा दुआ बापूसाहेबांच्या पाठीशी नक्कीच होता..
कोरोनाचे संक्रमण पलूस तालुक्यात झाल्यापासून बापूसाहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि स्वतः नागरिकांशी संवाद साधून लोकांना सतर्क राहण्याबाबत सूचना करत होते तसेच येणाऱ्या कोणत्याही अडचणीत संग्राम उद्योग समूह तुमच्या मदतीसाठी तत्पर असेल याची ग्वाही हि देत होते. नागरिकांना सॅनिटायझर, मास्क यांचे वाटप हि त्यांनी केले.
बापूसाहेब येसुगडे हे एक नाव नसून एक पर्व होते, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर त्यांनी आपला दबदबा जिल्हाभर ठेवलाच होता पण राज्यभर त्यांचे नावं आदबीनं घेतलं जातं. राजकारणातील एक जाणते आणि दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती होती आणि नेहमी राहील. त्यांच्या जाण्याने पलूस तालुका तर पोरका झालाच आहे शिवाय राजकारण आणि समाजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून न निघणारी आहे.
अशा या दिलदार मनाच्या, लढवैया बाण्याच्या, वरून जरी कठोर दिसत असले तरी आतून हळवे असणाऱ्या बापुसाहेबांना मानाचा मुजरा... आणि भावपूर्ण श्रद्धांजली..!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.