Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

महाराष्ट्रातील आजच्या तरुणाईला 'हे' माहिती आहे का ? - नक्की वाचा

|| महाराष्ट्रातील आजच्या तरुणाईला 'हे' माहिती आहे का ? - नक्की वाचा || लेखक - श्री.विजय कांबळे / भिलवडी - माजी सभापती -पंचायत समिती,पलूस
हल्ली महाराष्ट्रातील तरुणांची मानसिकता पाहताना खूप अस्वस्थ होतं, प्रत्येकाचा हातात मोबाईल आहे आपण काय पाहतो वाचतो याचा विचार कोणीही करत नाही ,पूर्वी माहितीची साधने उपलब्ध नसतांना लोकांनी पेपर पुस्तके वाचून लोक वैचारिक समृद्ध झाले , सध्या काही तरुण सोडले तर वैचारिकता आढळत नाहीमी काही विचारवंत किंवा हुशार नाही पण थोडे वाचन करतो, हे सर्व लिहण्याच कारण इतकच की एका इंजिनिअर तरुणाला विचारले की तुला यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतराव दादा, राजारामबापू पाटील, शरद पवार साहेब, पतंगराव कदम साहेब यांची काय माहिती आहे का ? तर तो म्हणाला थोडं माहीत आहे की हे पुढारी होते आणि पवार साहेब म्हंजे.. अस तो म्हणून छद्मीने हसला, त्याचे हे वर्तन पाहून फार वाईट वाटले, मी म्हणतो तुझी ही चार चाकी गाडी मोठं घर तुझा पैसा ही सगळी त्यांची देणगी आहे, तो म्हणाला कस काय ? आज महाराष्ट्रातील सगळ्या जाती धर्मातील लोकांना समृद्धी यांच्या मुळे मिळाली आहे, असे अनेक नेते आहेत पण मी सांगली जिल्ह्यातील असल्याने या नेत्यां विषयी सगळ्यांना माहीत पाहिजे. 

स्व.यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया घातला,आज बहुजन समाज्यातील मूळ इंजिनियर डॉक्टर आहेत याच श्रेय स्व, वसंतदादा यांना जात, त्यांनीच खाजगी संस्थाना इंजिनीअर कॉलेज स्थापन करण्याची परवानगी दिली, त्यामुळे खेडे गावात कॉलेज उभी राहिली, शेकडो तरुणांना रोजगार उपलब्द झाला, स्व, राजारामबापू यांनी महाराष्ट्र भर MIDC उभी केली, शरद पवार साहेबानी पुण्याचे रूप पालटले आज IT क्षेत्र असुद्या, मोठे उद्दोग पवार साहेबांनी आणले,पुण्यात आज हजारो मुलं नोकरी करतात स्व, पतंगराव कदम साहेबानी ग्रामीण भागात मेडिकल कॉलेज उभी केली, ठरावीक वर्गाची मक्तेदारी असलेली इंजिनीअर, डॉक्टर, वकील या क्षेत्रात बहुजन समाजातील मुले दिसतात ते यांच्या मुळे, मुंबई पुण्या सारख्या शहरात मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा यांनी ग्रामीण भागात पोहचवली.

चित्रपट, कथा कादंबऱ्यात, पुढार्यांना नेहमी भ्रष्टाचारी दाखवले , शेतकरी , बहुजन यांना समृद्ध करणारा सहकार नेहमी भ्रष्ट दाखवला साखर कारखाने सूत गिरणी , दुग्ध संस्था, भ्रष्टाचाराचे कुरण दाखवले, शिक्षण सम्राट म्हणून हिनवले पण आपणाला माहीत नाही की या सहकाराच्या मुळे आज आपण मोबाईल वापरतो , सुखी जीवन जगतोयसाखर कारखान्याचे शिक्षण संस्था उभारल्या, पाणी योजना मुळे हजारो शेती ओलिताखाली आणली, दुध डेअरी मुळे घरात पैसे खुळखळू लागले, सहकारी पतसंस्था, सोसायटी या मुळे गरीब लोकांना कर्जे मिळू लागली,शेती समृद्धी मुळे शेतकरी आणि शेत मजूर दोघेही दुखी झाले ,लोकांची खरेदी करण्याची शक्ती वाढली, वेगवेळ्या प्रकारची दुकाने ,बाजारपेठा उभ्या राहिल्या व्यापारी वर्गा बरोबर इतर जाती धर्मातील सुद्धा लोक व्यापार करू लागले.

आज जिल्यातील हजारो तरुण सूतगिरणी, साखर कारखाने, सहकारी संस्था शिक्षण संस्थात् नोकरी करतात, जिल्ह्यातील एव्हड्या लोकांना रोजगार नोकरी मिळाली असती का? याचा विचार आपण केला पाहिजे. प्रत्येकांनी आपल्या आजोबाच्या वेळी आपल्या घरची परिस्थिती कशी होती, आपली शेती किती व कशी होती हे आपल्या वडिलांना विचारा म्हणजे सांगतील,सांगली जिल्ह्यातील नागनाथअण्णा, जी दी बापू लाड, दिनकर आबा,आर आर आबा, प्रकाश बापू, देशमुख साहेब ( खानापूर शिराळा, आटपाडी)म्हैशाळकर शिंदे नाईक , असतील यांनी या मातीत सहकार रुजवला,जिल्ह्यातील सध्याची सगळी नेते मंडळी आप आपल्या परीने काम करत आहेत, या विषयावर भरपुर लिहता येईल, कुणाचा अवधनाने नामोल्लेख राहिला असेल तर माफ कर माझी येवडीच माफक अपेक्षा आहे की आपणाला चित्रपट हिरो हिरोईन क्रिकेटपटू यांचा विषयी खडानखडा माहिती आहे पण ज्यांचा मुळे आपल्याला थोडा फार फायदा झालाय त्यांच्या विषयी थोडी तरी माहिती पाहिजे थोडा वेळ मिळाला तर यांची ही आठवण ठेवा. 

 जय महाराष्ट्र...जय भारत..!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.