भिलवडीत नाविन्यपूर्ण संकल्पनेतून साकारला कोरोना गणेशोत्सव
भिलवडी l २३/८/२०२०
तंत्रज्ञानाच्या वाढत्या काळात लहान मुले मोबाईल,टिव्ही च्या आहारी गेलेले दिसतात.पण यातच काही भिलवडीतील तेजस गोरे व लहान मित्रांनी प्रेरणादायक उपक्रम राबवत गणेशोत्सवातून कोरोना विषयक प्रबोधन केले आहे.
कोरोना मुळे सार्वजनिकरित्या गणेशोत्सवावर साजरा करण्यावर सरकार ने मर्यादा आणल्यानंतर घरीच सृजनशील पणे कोरोना विषयक देखावा साकारत प्रबोधनाचा संदेश दिला आहे.कोरोना विषयक सर्व बारकावे यात टिपले असून राष्ट्राचे भविष्य असलेल्या मुलांमधील ही सामाजिक जाणीव प्रेरणादायी आहे.
तेजस गोरे व मित्र परिवाराने आज पर्यंत शिवजयंती निमित्त विविध किल्ल्यांचे देखावे साकारले आहेत.त्याचा या उपक्रमाचे समाजातील सर्वाच स्तरातून कौतुक होत आहे.सदर उपक्रमाकरिता निखिल गोरे,अभिषेक गोरे,यश साठे,दीप साठे,राजवर्धन कणसे,प्रियांका गोरे,सई साठे आदी बालवृंदाची मदत लाभली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.