Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

राष्ट्रीय नेतृत्वाचे आश्वासक व्यक्तिमत्व -डॉ. विश्‍वजीत कदम

राष्ट्रीय नेतृत्वाचे आश्वासक व्यक्तिमत्व -डॉ. विश्‍वजीत कदम



डॉ. संतोष माने / सांगली.

विचार ही मानवाला निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे. विचारांची ही धडपड माणसाला अधिक काहीतरी सुंदर व भव्यदिव्य नवनिर्माण करण्याची असते. ती धडपड माणसाला नवीन चेतना व उर्जा देणारी असते. राष्ट्रउभारणीच्या कार्यात ही सकारात्मक ऊर्जा  मोठी क्रांती करते. राष्ट्राचा व समाजाचा विकास हा त्या समाजाच्या विचारशक्‍तीवर व समाजातील लोकांच्या हितासाठी जे जे आवश्यक आहे ते स्विकरण्याच्या प्रक्रीयेवर अवलंबून असतो. बी पेरले तर पीक येते. एक वर्षाचा प्रश्न सुटतो. रोप लावले तर झाड येते. काही वर्षांनी फळे खायला मिळतात परंतु विचार पेरले तर पिढ्यांपिढ्या जतन होतात. समाजहित व राष्ट्र कल्याणाचा विचाराचा ध्यास असणारे व्यक्तीमत्व समाजात हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतात. देशाचा विकास मानव विकासाने व रोजगार वृद्धी करणाऱ्या प्रगतीनेच होतो या धेय्याने विचारांना कृतीची जोड देणारं सुसंस्कृत नेतृत्वं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्‍वजित उर्फ बाळासाहेब कदम हे होय.  शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक वैज्ञानिक ,माहिती तंत्रज्ञान, राजकीय, क्रीडा व सहकार क्षेत्रासाठी  नव नवीन आधुनिकतेला सामोरे जाणारे विचार कृतीत आणणारे व राष्ट्रीय नेतृत्वाचे आश्वासक व्यक्तिमत्व असणारे बाळासाहेबांचा आज दि. १३ जानेवारी वाढदिवस. त्या निमित्ताने......

आपल्या आगळ्या-वेगळया कार्यशैलीने समाजाभिमूख आदर्श निर्माण करणार्‍या आणि अल्पावधितच मतदारसंघात, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच देशपातळीवर सुध्दा नावलौकीक मिळविणारे व ज्यांचे नाव आदराने घ्यावे असे व्यक्तिमत्व भूषण म्हणजे डॉ. विश्वजीत कदम हे होय.


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या युवकांची मोठी संख्या दिसत आहे. त्यात बाळासाहेब हे उठून दिसतायत. मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषेत पारंगत, अभ्यासू वृत्ती, उत्कृष्ट वक्तृत्व ही त्यांची जमेची बाजू आहे.त्याचबरोबर ते टेक्नोसॅव्ही ही आहेत. त्यामुळे टि्वटर, इन्स्टाग्राम, फेसबुक आदी सोशल मीडियावर ते नेहमी सक्रिय असतात. देशातील विविध घडामोडींवर ते भाष्य करत असतात. 

द्वेष, मत्सर, बेरोजगारी, महागाई आणि हिसेविरुद्ध संघर्ष करून देशात प्रेम, एकता,समानता, बंधुत्वाचा संदेश देणे या दृष्टिकोनातून राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेमध्ये बाळासाहेबांनी महाराष्ट्रात नेत्रदीपक असे भरीव कार्य केलेले आहे. समरसता आणि समतेचा अत्यंत साधा आणि चिरस्थायी संदेश देणाऱ्या भारत जोडो यात्रेचा प्रचार आणि प्रसार बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये सूक्ष्म पद्धतीने आणि नियोजनबद्ध केल्यामुळे महाराष्ट्रातून या यात्रेला सर्वसामान्य जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद  मिळालेला आलेला आहे. बाळासाहेब स्वतः महाराष्ट्रात यात्रा मार्गावर ३८४ किमी चालले आहेत.

सन २०१३ मध्ये ११ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत"एक पाऊल संवेदनेचे दुष्काळाच्या सावटातून सावरण्याचे"ही टॅग लाईन घेऊन बाळासाहेबांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना बुलढाणा ते सांगली अशी ५३२ किमीची संवाद पदयात्रा काढली होती. २०१३ मध्ये काँग्रेसच्या सत्ताकाळात युवक काँग्रेसच्या माध्यमातून  राहुल गांधी यांच्या आदेशानुसार बाळासाहेबांनी ही पदयात्रा काढली होती. यावेळी पदयात्रेच्या माध्यमातून  मांडलेले दुष्काळ ग्रस्तांचे ज्वलंत प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात बाळासाहेबांना यश आले होते. या संवाद यात्रेचा बाळासाहेबांचा अनुभव भारत जोडो यात्रेच्या नियोजनबद्ध वाटचालीत खूप उपयोगी आला आहे.महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद वाढवण्यात धोरणात्मक, संघटनात्मक निर्णय घेत सबंध राज्यभर भारत जोडो यात्रेच्या प्रचार प्रसार दौरा आयोजित करुन नवयुवकांची , युवा राजकीय पदाधिकार्यांची अभ्यासपूर्ण बांधणी करण्यात बाळासाहेबांचा हातखंडा राहिलेला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलेल्या भारत जोडो यात्रेच्या दौऱ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणां मध्ये प्रचंड उत्साह संचारला असून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले वर मंञालयातील अनेक महत्त्वाच्या बैठका मध्ये मुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्र्यांच्या सोबत तसेच मंञालयीन उच्चपदस्थांच्या बैठकांमध्ये बाळासाहेबांची उपस्थिती असायची. महाराष्ट्र राज्याच्या विविध धोरणात्मक विकास कार्या निमित्ताने होऊ घातलेल्या  अनेक महत्त्वाच्या बैठकीत बाळासाहेब नेहमी  हे भाग घेताना दिसत असल्यामुळे त्यांच्या अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्वाची ओळखआपणास पाहावयास मिळते.बाळासाहेबांची  निर्णयक्षमता ,बुध्दीकौशल्याचा उपयोग ,पक्षसंघटनेचे बळकटीकरण सोबत राज्याच्या विकासाचे धोरण तयार असल्याचे जाणवले.

महाराष्ट्रातील काँग्रेस मधून राष्ट्रीय स्तरावर सक्षम नेतृत्व असणारा चेहरा बाळासाहेबांच्या रूपाने अधिक विश्वासार्ह आणि समाजशील मानला जातो आहे. आपण सर्वजण जाणता की राजकारणा मध्ये परिस्थिती अनुरुप निर्णय घ्यावे लागतात माञ बाळासाहेब हे युवकांना मोहनी घालणारे ,महाराष्ट्रातील जनतेचा मनावर अधिराज्य गाजवणारे, सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, बाळासाहेब थोरात यांच्या छञछायेखाली आपल्या समाजशील कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेसला क्रमांक एक चा पक्ष निर्माण करण्यास कटीबध्द असल्याचे चिञ दिसत आहे.

बाळासाहेबांचा विश्वास आणि त्यांचं पाठबळ हे सदैव आम्हाला जीवनाची नवीन प्रेरणा देतं.  एक नवी बळ देतं.  

जागतिक स्तरावरती नेतृत्व निर्माण करणारे  विद्यार्थ्यांनी यशाची नवनवीन शिखरे पादांक्रात करावी या दृष्टिकोनातून सर्व समावेशक उच्च शिक्षणाच्या विविध शाखा, स्पर्धा परीक्षेची योग्य दिशा, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पायाभूत सुविधांची मदत विद्यार्थ्यांना मिळावी ह्या अनुषंगाने बाळासाहेब नेहमी सकारात्मक पणे प्रयत्नशील असतात. लोकशाही, सुप्रशासन आणि आधुनिकता या गोष्टींचा बाळासाहेबांच्या कार्यशैलीत नेहमी समावेश आपणास दिसून येतो आहे.

भरती- ओहोटी ही प्रत्येकाच्या जीवनात येते. मात्र, आलेल्या प्रसंगाला तोंड देऊन माणसाने स्थितप्रज्ञ कसे राहावे? कितीही उंचावर गेला तरी पाय मात्र जमिनीवर हवेत हा स्वर्गीय डॉ.पतंगराव कदमसाहेबांचा गुरुमंत्र बाळासाहेबांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनामध्ये तंतोतंत पालन केल्याचे आपणास त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासावरून दिसून येते. पारदर्शक कारभाराची, विश्वासार्ह सेवेची, बाळासाहेबांची उत्तुंग झेप ही सर्व सामान्यांच्या सर्वांगीण प्रगतीची आहे असे आपणास म्हणावे लागेल. 

अग्नीच्या साथीने जशी ज्योत प्रज्वलित होते, तसे आध्यात्मिकता माणसाच्या जीवनाला पूर्णता देते. अध्यात्म म्हणजे चांगली कर्म करणे, निस्वार्थीपणे जगणे या ध्येयाने बाळासाहेब समाजातील सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या आध्यात्मिक कार्यक्रमाना  नेहमी आवर्जून उपस्थित राहतात. मोहरम, गणपती उत्सव, नवरात्र, हनुमान जयंती गोकुळाष्टमी रामचंद्र जयंती,रमजान ईद, बकरी ईद, नाताळ,यात्रा, जत्रा  अशा नानाविध कार्यक्रमांना उपस्थित राहून जनतेशी सुसंवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे बाळासाहेब हे सामाजिक ऐक्याचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे आपणास दिसते.

दुसऱ्याला हसणे फार सोपे असते पण दुसऱ्याकरिता रडणे फार कठीण असते. त्याला अंतःकरण असावे लागते. असं अंतःकरण असणारा कदम परिवार म्हणजेच भारती विद्यापीठ परिवार आज समाजामध्ये अविरतपणे कार्यरत आहे. दुःखी माणसास, समाजास हिंमत,  धैर्य, दिलासा देवून त्यांच्या मुखावरील हरवलेले स्मित पुन्हा निर्माण करणे ही आर्ततेने  केलेली परब्रह्माची आरती असते. महापूर, दुष्काळ, कोरोना अशा अनेक परिस्थितीमध्ये समाजाच्या सुखदुःखामध्ये खंबीरपणे पाठीशी राहून समाजामध्ये सक्रिय असणारे कर्तृत्ववान घराणे म्हणजे कदमपरिवार. या कर्तृत्ववान घराण्याचा कर्तृत्ववान वारसदार बाळासाहेब हे आहेत. आपल्या समाजामध्ये त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यातून बाळासाहेबांचे सामाजिक उत्तरदायित्व आपणास क्षणोक्षणी   दिसून येत आहे. 

२१ व्या शतकात भारत संस्कृतीच्या बरोबर विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने जगावर राज्य करण्यास सक्षम असेल. आज आपण पाहतो आहे की भारतीय प्रतिभेने जगभरात छाप उमटवली आहे. येणाऱ्या काळात भारताला जगाचे नेतृत्व करायचे आहे. यासाठी शेती, उद्योग, शिक्षण या तिन्ही क्षेत्रात सर्वोच्च शिखरे गाठावी लागतील या अनुषंगाने बाळासाहेब भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या माध्यमातून आज कार्यरत आहेत. जागतिक कीर्तीचा सन्मान प्राप्त करणारे भारती विद्यापीठ अभिमत  विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू म्हणून बाळासाहेब हे संशोधन, शिक्षण, आरोग्य, सहकार आदी  क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करीत आहेत. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुनर्बांधणीचे एक महत्त्वाचे सोनेरी पान बाळासाहेबांच्या अष्टपैलू नेतृत्वाखाली लिहिले जाऊ लागले आहे.

राजकारण करीत असताना सत्तेत असो वा नसो बाळासाहेबांनी पक्षीय लक्ष्मणरेषा ओलांडून सर्वांना सोबत घेऊन समाज विकासासाठी कार्य केल्यानेच राज्यात त्यांचे संबंध सलोख्याचे व मैत्रीचे राहिलेले आहेत.  काँग्रेस पक्षांत असूनही मित्रपक्ष तसेच विरोधी पक्षांत देखील त्यांचे चाहते आढळून येतात.  जरी
बाळासाहेब काँग्रेस पक्षात असले तरी त्यांना मानणारा कार्यकर्ता प्रत्येक पक्षात आहे. बाळासाहेबांच्या अभ्यासू वृत्तीची आणि निरपेक्ष कृतीची भूरळ विरोधी पक्षातील नेत्यांनाही पडलेली दिसून येते. त्यामुळे बाळासाहेबांच्याबद्दल विरोधकांना आपुलकी आहे.

सामाजिक जीवनात वावरताना प्रॅक्टीकल विचार करुन त्याला कृतीची पुरक जोड देणारी जी काही मोजकी युवा नेतेमंडळी महाराष्ट्रात आहेत, त्यात बाळासाहेबांचाअव्वल क्रमांक लागतो. कोणताही राजकीय भेदाभेद न ठेवता समाजातील प्रत्येक घटकासाठी  बाळासाहेब ज्या तळमळीने, तडफेने शक्य ती मदत करत आहेत, त्याला तोड नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येकाला त्यांच्या प्रती जिव्हाळा, आदर, आपलेपणा वाटतो. पक्षीय भेद, विचारधारा जरी भिन्न असल्यातरी एकमेकांप्रती आदर, मैत्री, जिव्हाळा, आपुलकी सांभाळण्याची आणि जपण्याची आपल्या महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक परंपरा आहे. हा संस्कार बाळासाहेब सामाजिक व राजकीय जीवनात  कार्यरत असताना रुजवत असल्याचे आपणास दिसून येते.

महापूर, दुष्काळ, कोरोना संकटाच्या काळात प्रत्येकाने एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. या संकट काळात कोणीही, कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही केलं पाहिजे. मदतीच्या कामांचा दिखावा केला नाही पाहिजे. प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असं आपल्या सांगली जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पक्षाच्या बैठकीत रोखठोकपणे सांगणारे बाळासाहेब त्यामुळेच वेगळे ठरतात. त्यांचा हा रोखठोक सल्ला राजकीय, सामाजिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येकालाच अंतर्मुख करणारा आहे. नवोदितांना दिशा देणारा, मार्गदर्शन करणारा आहे.

सांगलीच्या मातीशी घट्ट नाळ असलेला हा संवेदनशील युवानेता महाराष्ट्रात असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करताना त्यांची नेहमीच सर्वांना मदत होते, हे नम्रपणे नमुद करावे लागेल. त्यांच्या या सहकार्याच्या, संवेदनशीलतेच्या भावनेमुळेच सांगलीप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ते लोकप्रिय आहेत. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी केलेला अलौकिक कार्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल प्रत्येकाला आपुलकी, आपलेपणा वाटतो. सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्यात कधीही ऐकारलेपणा, अहंकार, आत्मप्रौढी दिसत नाही, हेच त्यांचे वैशिष्ट्यं म्हणावे लागेल. 

आरोग्य सुविधांच्या बाबतीत उच्च दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली भारती विद्यापीठाने पुणे, सांगली, कडेगाव येथे भारती हॉस्पिटलच्या माध्यमांतून असंख्य गरजू रुग्णांना मोफत व माफक आरोग्य सेवा सुविधा पुरविण्याचे काम “ मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा “ या भावनेतून आजही सुरु आहे. कोरोना काळात संपूर्ण जग थांबलेले असतांना भारती हॉस्पिटल पुणे महाराष्ट्राला या महामारी तून बाहेर काढण्यासाठी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. 

सांगली जिल्ह्यातील वाडया-वस्त्यांवर आणि पुणे मुंबई सारख्या शहरांमधील टोलेजंग वास्तूतही सारख्याच आनंदाने वावरणारे आणि त्याठिकाणाच्या लोकांशी सदैव आपुलकीने वागणारे  बाळासाहेब खरोखर जनमाणसांच्या कसोटीला उतरलेले असामान्य नेतृत्व आहे.

स्वउन्नतीबरोबरच समाजोन्नतीसाठी अविरत कार्यरत राहणं हे बाळासाहेबांचे स्वभाव वैशिष्ट्य प्रत्यक्ष मला अनुभवता आले. 

सर्वसामान्याच्या  विकासासाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समर्पित करणारे व्यक्तिमत्त्व इतिहासात  प्रेरणादीप बनून चिरंतन कार्यरत राहतात. असे  प्रेरणादीप समाजात फार थोडे असतात.  आपल्या कर्तुत्वशक्तीने इतराच्या आयुष्याला परीस स्पर्शाप्रमाणे  लखलखीत करणारे बाळासाहेबांचे कर्तृत्व प्रेरणादायी आहे. विचारांना कृतीची जोड देणारं सुसंस्कृत नेतृत्वं असणाऱ्या बाळासाहेबांची निस्पृह कार्यप्रणाली महाराष्ट्रातील अनेकांच्या कार्यप्रवणते मागील प्रेरणा व ऊर्जा आहे. खरं पाहता ऐश्वर्यात वाढलेल्या या व्यक्‍तीमत्वाने सर्वसामान्यांच्या प्रश्‍नासाठी केलेला हा प्रयत्न खरोखरीच कौतुकास्पद आहे.  कांग्रेस पक्षाच्या विचारधारेशी श्रध्दा असणाऱ्या युवाकांचे बाळासाहेबांनी महाराष्टात मोठ्याप्रमाणात संघटन केले आहे. कॉंग्रेसचा विचार तळागाळापर्यंत  रुजविण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न. आजवरच्या प्रवासात बाळासाहेबांना अनेकांनी त्यांना पैशाच्या,पदाच्या ऑफर दिल्या पण बाळासाहेबांना या पदाचा, पैशाचा लोभ न करता पक्षाशी यांचे एकनिष्ठ राहिले, सावली बनून राहिले.याच निष्ठेचे फळ म्हणून कॉंग्रेस पक्षाच्या जाहिरनामा समितीवर सदस्य, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष झाले व सध्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून बाळासाहेबाची झालेली निवड ही त्यांच्या संघटन कौशल्याची पोहोच पावतीच होय. 

महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांधापर्यंतच्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याला डॉ. विश्वजीत कदम यांच्याबद्दल  एक विश्वास आहे. हा नेता युवकांचा आवाज पाहतो आणि म्हणूनच अशा क्रियाशील व  उच्च विद्या विभूषित युवा नेतृत्वाकडे कॉंग्रेस पक्षाचे नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय युवानेते  राहुल गांधी यांच्यापासून देशपातळीवर राज्यपातळीवर कॉंग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक महनीय नेत्याला डॉ. विश्वजीत कदम हा युवा नेता आश्वासक वाटतो. म्हणूनच महाराष्ट्राचे  राज्यमंत्री व  प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष  ही जबाबदारी कॉंग्रेसच्या वरिष्ठांकडून मिळाली आहे. ती जबाबदारी बाळासाहेब उत्कृष्ट पद्धतीने सांभाळत आहेत.  कुशल संघटक व समाजहित जपणारे नेतृत्व म्हणून बाळासाहेबांची प्रतिमा सर्वसामान्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे.

बाळासाहेबांचे सामाजिक, शैक्षणिक, सहकार,क्रिडा,  सांस्कृतिक, कौटुंबिक व राजकीय योगदान अविस्मरणीय म्हणता येईल अशा स्वरूपाची आहे.  त्यांच्या नेतृत्वाचा आणि पराक्रमाचा रथ असाच अधिक अधिक वेगाने आणि सर्वदूर पोहोचावा अशा प्रकारे मी इश्वराकडे आणि जनता जनार्दनाकडे प्रार्थना  करतो.

नवतंत्रज्ञानाचे आणि आधुनिकतेचे आचरण करणारे सन्माननीय बाळासाहेब आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर भारती विद्यापीठ आणि संलग्न संस्थांच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्वाच्या किर्तीचा सुगंध पसरवत आहेत. राज्याच्या प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. 

नवकल्पनांच्या जोरावर आणि धडाकेबाज कृतीतून त्यांच्या हातून समाजाची सेवा निरंतर घडो, त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.बाळासाहेबांच्या प्रभावाचे व सामर्थ्यांचे जे क्षेत्र आहे ते उत्तर उत्तर अधिकाधिक वृद्धिगंत व्हावे ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.