Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

असं विश्वजीत साहेबांसारखं धडाडीचं नेतृत्व आम्हालाही पाहिजे : विदर्भ, मराठवाड्यातील जनमतअसं विश्वजीत साहेबांसारखं धडाडीचं नेतृत्व आम्हालाही पाहिजे : विदर्भ, मराठवाड्यातील जनमत

- अमोल वंडे / बुलढाणा - दि. २०/११/२०२२

- ९८९० ५४६ ९०९

महाराष्ट्रामधे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करीत खा.राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो' यात्रा दाखल झाली. महाराष्ट्रातील पहिल्या दिवसापासून मराठवाडा व विदर्भात डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले.

( भारत जोडो पदयात्रेत साहेब व बाळासाहेबांविषयी कित्येक व्यक्तींशी संवाद साधता आला..त्याच अनुभवांचे हे शब्दांकन...)

नांदेड,हिंगोली,वाशीम, अकोला, बुलढाणा या मार्गावर २५० कि.मी. हन अधिक पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी झालो. भारत जोडोची प्रचंड ऊर्जा, भारलेलं वातावरण, त्यात ६००-७०० किलोमीटर दूरहून आलेले बाळासाहेबांचे कार्यकर्ते पहिले की स्थानिक ग्रामस्थ व मान्यवर स्वतःहून भेट घेत डॉ. पतंगराव कदम साहेब, डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्वाविषयी भरभरून बोलत होते.

१४ नोव्हेंबरची हिंगोलीची विराट गर्दी पाहून स्थानिक नागरिक डॉ. विश्वजीत कदम साहेबांचं कौतुक करताना थकत नव्हते. सत्ता असो वा नसो कदम साहेबांची नाळ सर्वसामांन्यांशी जोडलेली असून ते  सदैव कार्यरत असतात असं कित्येक शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं.

तेलंगाना सीमेहून आलेल्या एका युवकाने केंद्राचा ICT प्रकल्प डॉ. पतंगराव कदम साहेबांनी कसा राज्यात राबविला हे सांगत सामाजिक कार्यात कदम कुटुंबाचा हात कोणी धरू शकत नाही असं अनुभवासहित सांगितले.

दोन्ही हात नसलेल्या हिमाचल प्रदेशातील दिव्यांग भारतयात्री सूरज शर्मा यांनी महाराष्ट्र देशाला हिंमत देईल हे सांगताना बाळासाहेबांनी दिलेल्या योगदानाचं आवर्जून कौतुक केले.

प्रवासा दरम्यान भेटलेल्या राजस्थानच्या रुबी यांनी डॉ. विश्वजित कदम हे प्रेरणादायी नेतृत्व असून त्यांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहभागमुळे राहुल गांधीसह  सर्व भारतयात्रीनाही प्रेरणा मिळत आहे हे सांगताना भरभरून बोलत होत्या.

स्वराज्य इंडिया मोहिमेचे मा. योगेंद्र यादव यांनीही डॉ. विश्वजीत कदम साहेबांविषयी अधिक जाणून घेत, असं योगदान हे भारत जोडो मोहिमेचा उत्साह वाढविणारा असल्याचे नमूद केले.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. मेधा पाटकर यांनी तर भारत जोडो सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरेल  असं सांगताना डॉ.पतंगराव कदम साहेब संवादशील होते व डॉ. विश्वजीत कदम साहेबांना उज्ज्वल भविष्य असल्याचे सांगितले.

संपूर्ण भारतभर चालणाऱ्या भारतयात्रीमध्ये महाराष्ट्रातील मोजके ९ जण आहेत. त्यापैकी नाशिकच्या श्री.श्रावण रिपेनवाड यांनी महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा यशस्वी होण्यामधे आ.डॉ.विश्वजीत कदम यांचे फार मोठे योगदान असल्याचं सांगितले. त्यांना पहिल्या दिवसापासून ५ राज्यांचा अनुभव असल्याने त्यांच्या निरीक्षणाला विशेष महत्व आहे.

दिल्लीच्या भारतयात्री प्रज्योतने  "मी भारताचा नागरिक डॉ. विश्वजित कदम साहेब तुम्हाला सॅल्यूट करतो" असं म्हणताच आमचं अंगही शहारुन गेलं.

"मिल जाए...जुड जाए..ऐ  वतन.." असं म्हणतं असताना डॉ.पतंगराव कदम यांच्या आठवणी सांगत डॉ.विश्वजीत कदम यांच्यासारखं नेतृत्व आम्हालाही हवं असं स्थानिक नागरिक आवर्जून सांगत होते आणि गेले कित्येक वर्षे साहेबांनी व बाळासाहेबांनीही राज्यभर केलेल्या आपल्या कामाच्या पेरणीचे हे द्योतक होते.

भारत जोडोमध्ये महाराष्ट्रातील पदयात्रेत पूर्णवेळ सहभागी होणे हे  आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या जिद्दीची प्रचिती देते. त्यांच्या नेतृत्वाचा सर्वदूर महाराष्ट्रात व दिल्लीपर्यंतही असलेला हा प्रभाव पाहून त्यांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. डॉ. विश्वजीत कदम यांच्या चौफेर नेतृत्वाकडून महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आता उंचावल्या आहेत हे मात्र खरं.

####


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.