Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

कृष्णाकाठच्या भिलवडीत राष्ट्रगीताचा जनजागर | राष्ट्राला आदर्शवत उपक्रमाची राज्यभर चर्चा

कृष्णाकाठच्या भिलवडीत राष्ट्रगीताचा जनजागर | राष्ट्राला आदर्शवत उपक्रमाची राज्यभर चर्चा

भिलवडी | २६/०१/२०२२ 

भिलवडी व्यापारी संघटनेच्यावतीने प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रगीताचा जनजागर हा उपक्रम आयोजित करण्यात आला.  


राष्ट्रगीताने आपल्या व्यापाराची सुरुवात करणारे भिलवडी हे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे.त्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रगीताचा जनजागर हा उपक्रम आयोजित करण्यात आला.दररोज सकाळी  9.10 मिनिटांनी या ठिकाणी राष्ट्रगीत होते. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रगीताबरोबर भिलवडीतील सर्व ग्रामस्थांनी स्वतः राष्ट्रगीताचा जयघोष केला.


गावातील आजी माजी सैनिक संघटना,पत्रकार संघटना, भिलवडी आणि माळवाडीतील आशासेविका,भिलवडी पाेलिस ठाण्याचे सर्व पोलिस बांधव,महावितरण,पोस्ट ऑफिसचा सर्व स्टाफ भिलवडी मॉर्निंग वॉकर्स,चॅलेंजर्स ग्रुपचे सर्व खेळाडू,कुडो कराटे असोसिएशनचे सर्व खेळाडू,प्रवासी वाहतूक संघटना  भोईराज ग्रुप यांच्यासह भिलवडीतील सर्व ग्रामस्थ आणि वेगवेगळ्या मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.  

सुमारे 3000 जणांनी एकदम गायलेल्या राष्ट्रगीतामुळे वातावरण एकदम देशभक्तिपूर्ण बनले.जिल्ह्यातील अशा पहिल्यावहिल्या उपक्रमाचे नियोजन व्यापारी संघटनेच्या  महेश शेटे, दिलावर तांबोळी, दादा सावंत, समीर कुलकर्णी, घनश्याम रेळेकर, बापू जगताप, अशोक अष्टेकर,   जगदीश माळी, सचिन नावडे, विजय शिंदे, तुकाराम पाटील,निसार इबुसे,  कामिल मिर्झा,बशीर आत्तार, किरण पाटील आदींनी केले.  

भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील,  उपसरपंच पृथ्वीराज पाटील,  महावितरणच्या उज्ज्वला सदाकळे, कृष्णाकाठ न्यूजचे संपादक अमोल वंडे आदी मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.