Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

कृष्णाकाठच्या सौ. अरुणा सूर्यवंशी यांचा स्त्री प्रतिष्ठा समाजसेविका राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान


कृष्णाकाठच्या सौ. अरुणा सूर्यवंशी यांचा स्त्री प्रतिष्ठा समाजसेविका राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान 

सांगली | दि.२१/४/२०२२ 

साहित्यिक, सामाजिक व  सांस्कृतिक विश्वात मानाचा शिरपेच धारण करणाऱ्या प्रतिष्ठा फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय समाजसेविका पुरस्काराने अंकलखोप गावच्या व भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालययामध्ये सेवेत असणाऱ्या सौ. अरुणा अमोल सूर्यवंशी यांना सन्मानित करण्यात आले.

सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सभागृह येथे ६ वा प्रतिष्ठा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या शानदार सोहळ्यात सौ. अरुणा अमोल सूर्यवंशी यांना माजी खासदार श्रीमती निवेदिता माने,  सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकच्या उपाध्यक्ष, श्रीमती जयश्रीताई पाटील तसेच मा. अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली सौ. प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराव जाधव सौ. विद्या जाधव विविध पक्षातील नगरसेविका यांच्यासह इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या. 

यावेळी बोलताना मा.खासदार निवेदिता माने म्हणाल्या राष्ट्र समाज आणि विकासाचा कणा असलेल्या स्त्रियांना सक्षम करणे हा त्यांचा खरा सन्मान आहे. पुढे सौ.सूर्यवंशी यांच्या समाज सेवेतील उपक्रमाला दुजोरा देत श्रीमती निवेदिता माने म्हणाल्या की अरुणा सूर्यवंशी यांनी आपल्या पगारातून ठराविक रक्कम बाजूला ठेवून जे समाजकार्य करीत आहेत त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे। त्यांच्या या कार्याचे खासदार निवेदिता माने यांनी आपल्या भाषणात कौतुक केले.

भारती विद्यापीठाचे संस्थापक मा. डाँ. पतंगराव कदम साहेब, प्र-कुलगुरू व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना. डॉ. विश्वजीत कदम साहेब, शालेय समिती अध्यक्षा, मा. विजयमाला कदम वहिनीसाहेब यांची प्रेरणा व आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सौ. अरुणा सूर्यवंशी यांनी समाजसेवेचे उल्लेखनीय असे कार्य करीत कर्तुत्वशक्तीने आपली मोहोर उमटविली आहे. सौ. अरुणा सूर्यवंशी या गेली 16 वर्षे प्रशासकीय कार्यालयामध्ये कार्यरत आहेत.    

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील बोलताना म्हणाल्या आजच्या काळात महिला कुठेही मागे राहिलेल्या नाहीत. त्या प्रगती करत अडचणीवर मात करून पुढे जात आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा  सौ. प्राजक्ता कोरे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाल्या आपण धाडसाने पुढे गेलो तर आपल्याला कोणी रोखू शकत नाही. तेव्हा धाडसाने पुढे जाऊन मिळालेल्या संधीचं सोनं करायला पाहिजे.

सौ अरुणा सूर्यवंशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपस्थित सर्व महिलांना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेऊन सर्वानी आपल्यांना जमेल त्या पद्धतीने समाजकार्य करावे. ज्यांना मदतीची गरज आहे, अशांना मदत करावी. आपण जिजाऊ बनून शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करावे.

आपला एक मदतीचा हात हजारो लोकांचे कल्याण करू शकतो. असे सांगत जय भवानी, जय शिवाजी बोलत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले.सौ.अरुणा सूर्यवंशी यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.