कोरोनाच्या साथीमध्ये पावसात भिजताय / प्रवास करताय ? - नक्की वाचा
- अमोल वंडे /भिलवडी - ७/८/२०२०
कामानिमित्त गेली सहा वर्षे झाली दुचाकी वरून प्रवास नित्याचा आहे..पावसाळाही दरवर्षीच येतो...त्यामध्ये पावसात प्रवास करावाच लागतो...तसं बरेच दिवस पावसात भिजल्यावर सर्दी,ताप,डोकं दुखणं किंवा इतर लक्षणं ही सर्वसाधारण बाब आहे.याची भीती कधीच वाटली नाही.
मात्र यावर्षी कोरोनाच्या साथीमध्ये थोडं जरी त्रास जाणवू लागला तरी उगाचच मनात संक्रमणाची शंका येऊ लागते.आपण प्रतिकार शक्ती वाढवत आहोत...सर्व काळजी घेत आहोत हे सर्व जरी खर असलं..तरी या कोरोनाची आणि पावसाळ्यातील सर्दी,ताप,डोकं दुखणं किंवा इतर लक्षणं ही सारखीच आहेत...हे दुर्लक्षित करता येत नाहीत.
इंग्लड चे राजे प्रिन्स चार्ल्स ,कलाकार अमिताभ बच्चन ,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इतकी काळजी घेऊन यांना कोरोना होऊ शकतो तर येणाऱ्या काळात हे संक्रमण आपल्यालाही कधीतरी होऊ शकतं याची मानसिक तयारी देखील आहेच...पण चुकून दुसऱ्यामुळे आपल्याला झाला तरी आपल्यामुळे कुणाला हे संक्रमण होऊ नये ही खरी अपेक्षा आहे.
प्रशासन सांगत आहे त्याप्रमाणे कोरोना सोबत आपण जगायला शिकलंच पाहिजे..पण आपआपल्या कर्तव्यावर असताना "जर हे संक्रमण कुणाला झाले तर आपल्या सानिध्यातील त्या व्यक्ती प्रती सद्भावना कमी होऊ न देणं हे गरजेचं आहे." त्यांना मानसिक आधार देणं ही काळाची गरज आहे.कोरोनाच्या साथीच्या सुरवातीच्या काळात एखादा संक्रमित व्यक्ती सापडणे म्हणजे एखादा गुन्हेगार सापडावा असं वातावरण जनमानसात होतं..सुदैवानं हा सामाजिक दबाव जनजागृती झाल्यानं कमी झाला आहे,जो की फार गरजेचा होता.
पावसाळ्यात कमी सूर्यप्रकाश व हवेत वाढलेल्या विषाणू चे प्रमाण यामुळे सर्दी,पडसे,खोकला हे देखील मनात आपण संक्रमित झालो कि काय अशी शंका येण्यास पुरेसे वाटू लागले आहे. या पावसाळ्यात शक्य तितका पावसातील प्रवास,पावसात भिजणं कमी करायला हवं. सोशल म्हणणार नाही पण फिजिकल अंतर ठेवायला हवं..सर्वांनी स्वत: काळजी घेऊन राहिलं तरी आपण पर्यायाने समाज पूर्ण या संकटातून लवकरात लवकर बाहेर येऊ शकतो. आपला जिल्हा,राज्य,देश लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे हीच अपेक्षा..धन्यवाद..!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.