Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

कृष्णाकाठ २०२० - पूर परिस्थिती आणि डॉ.विश्वजित कदम सदैव सोबत


कृष्णाकाठ २०२० - पूर परिस्थिती आणि डॉ.विश्वजित कदम सदैव सोबत 

भिलवडी | अमोल वंडे - कृष्णाकाठ न्यूज - १९/८/२०२० 

२०१९ च्या महापुराचा अनुभव असलेने अगदी सुरवातीपासून पालकमंत्री ना.जयंत पाटील साहेब यांच्या सोबत सरकारच्या माध्यमातून पूर न येण्यासाठी डॉ.विश्वजित कदम प्रयत्नशील राहिले.त्यातून प्रशासनातर्फे सर्व गावांना बोटी दिल्या गेल्या.पूर पूर्व तयारी फार मोठ्या प्रमाणावर केली गेली.आता पावसावर सर्वांचे लक्ष होते.

यंदा पूर नाही अस वाटत होतं...१७ ऑगस्ट ला विदेशी बोटी डॉ.पतंगराव कदम आपत्ती निवारण च्या माध्यमातून  बाळासाहेबांनी लोकार्पण केल्या...पाणी नाही येणार असं वाटत  असतानाच  ५-६ दिवस मोठा पाऊस झाला.कोयनेचे पाणी सोडल्या नंतर १८ ऑगस्ट २०२० ला भिलवडी पुला वर पाणी आलं...धनगाव रस्ता बंद झाला....काही दुकानात पाणी शिरलं...मौलाना नगर वसाहतीत पाणी शिरलं

गावात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरेल असा अंदाज येऊ लागला तोच बाळासाहेबांनी कृष्णाकाठावर सर्वत्र भेटी देत पाणी वाढणार नाही लवकरच उतरेल असा विश्वास लोकांना दिला..प्रथमच टेंभू,म्हैसाळ योजना पावसाळ्यात सुरु करून पूर नियंत्रणाचा प्रयत्न झाला..गेल्या वर्षी अजिबात प्रतिसाद न देणारं अलमट्टीचं प्रशासन सातत्यपूर्ण संपर्कामुळे सुरवातीपासून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करत होते.सगळ्यांचा परिणाम म्हणजे होणारी फार मोठी हानी रोखली गेली.

प्रशासनाला सोबत घेऊन लोकांची फक्त जेवण,निवाऱ्याची सोयच केली नाही तर दोन घास स्वत: त्यांच्या सोबत बसून जेवल्याने त्यानाही धीर आला.ना.डॉ.विश्वजित कदम अर्थात बाळासाहेबांचा आधार जनसामान्यांच्या मनात आहे...आणि तो दिवसेंदिवस अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे...आणि हीच बाळासाहेब सदैव  निरंतर सोबत असल्याची साक्ष कृष्णाकाठ च्या मनात  आहे.  

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.