किर्लोस्कर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला चंद्रयान-३ चे लाईव्ह प्रक्षेपणाचा अनुभव
कृष्णाकाठ न्यूज l दि.१४/७/२०२३
किर्लाेस्करवाडी: येथील विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या किर्लोस्कर हायस्कूल अँड ज्युनिअर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला चांद्रयान-३ थेट प्रक्षेपणाचा लाईव्ह अनुभव घेतला.
किर्लोस्कर हायस्कूलच्या एलसीडी सभागृहामध्ये चांद्रयान-३ चे प्रक्षेपणाचा लाईव्ह कार्यक्रम आयोजित केला होता. भारताने शुक्रवारी चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून नियोजित वेळेनुसार दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-२ चे प्रक्षेपण करण्यात आले. एलव्हीएम ३-एम ४ रॉकेटने चांद्रयान-३ ला आपल्या अचूक कक्षेत प्रस्थापित केले आहे.
चांद्रयान ३ ला एलव्हीएम ३-एम ४ या रॉकेटपासून यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. इस्रो’चे चांद्रयान इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले असून नवोदित वैज्ञानिक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असे कार्य आहे असे सांगत प्रभारी प्राचार्य यु.बी.कुलकर्णी यांनी या महत्त्वाच्या क्षणी मिळालेल्या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे व देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी या ऑनलाईन प्रक्षेपणाचा अनुभव घेत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले.
चंद्रयान-३ यशस्वी प्रक्षेपणाचा थेट लाईव्ह अनुभव घेतल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती यावेळी दिसून येत होता. हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी अभय बिराज, जे. आर. लोखंडे, सौ. मिना टिंगरे यांच्या सहित सर्व शिक्षकांनी अनमोल सहकार्य केले.
विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. प्रतिमा किर्लोस्कर, विश्वस्त रवी सिन्हा, विद्याधिकारी सी. व्ही. देशपांडे, प्रशासकीय अधिकारी सौ.सुधा मोहिते यांच्या सहित सर्व अधिकारी व काॅलेजचे प्रभारी प्राचार्य यु.बी.कुलकर्णी यांचे या चंद्रयान-३ चे प्रक्षेपणाचा लाईव्ह अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.