(भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय वर्धापन दिन विशेष - २०२३ )
कृष्णाकाठ न्यूज | अमोल वंडे / भिलवडी - ९८९० ५४६ ९०९
गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन हे ध्येय उराशी ठेऊन डॉ. पतंगराव कदम साहेबांनी १० मे १९६४ रोजी पुणे येथे भारती विद्यापीठ संस्थेची स्थापना केली. स्थापनेवेळीच संस्थेच्या घटने मध्ये ही संस्था एक दिवस विद्यापीठ होईल असे नमूद केले. दर्जेदार शिक्षण व गुणवत्तेच्या जोरावर भारती विद्यापीठ संस्थेला शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी २६ एप्रिल १९९६ मध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय म्हणून क्षितिजावर उदयास आले.
संस्थापक कुलपती डॉ . पतंगराव कदम साहेब यांच्या विचारांवर चालत असताना त्यांचे कार्य अव्याहतपणे पुढे नेण्याचे कार्य राज्याचे माजी मंत्री व प्र - कुलगुरू डॉ. विश्वजित कदम साहेब करीत आहेत. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण कार्यामध्ये भारती विद्यापीठाच्या कुटुंबप्रमुख मा.विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब यांचे अनमोल मार्गदर्शन लाभत आहे. तसेच विद्यमान कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम सर, कुलगुरू डॉ. विवेक सावजी तसेच प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक व सेवक कार्यरत आहेत.
वैशिष्टे :
भारती विद्यापीठ (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी) भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त
सर्व कोर्सेसना UGC आणि संबंधित वैधानिक परिषदांची मान्यता आहे.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) आणि असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीज (ACU) चे सदस्य,
२३०००+ विद्यार्थी
१६००+ शिक्षक
१२ विद्याशाखा
२५०+ प्रोग्राम्स
३ संशोधन संस्थांसह 29 घटक संस्था
८ कॅम्पस
संपूर्ण भारत आणि ४८+ देशांतील विद्यार्थी
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय हे कला, सामाजिक विज्ञान आणि वाणिज्य, विज्ञान, कायदा, वैद्यकीय विज्ञान, दंतचिकित्सा, आयुर्वेद, होमिओपॅथी,नर्सिंग,फार्मास्युटिकल सायन्सेस, व्यवस्थापन अभ्यास,अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान,आंतरविद्याशाखीय अभ्यास यासह विविध क्षेत्रात शिक्षण देत आहे.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाने नवी शैक्षणिक उत्कृष्टता स्थापित केली आहे. ग्रामीण , शहरी भागासह सांगली पासून पुणे, मुंबई, दिल्ली व परदेशातही कार्यरत असून विद्यापीठाने नाविन्यपूर्ण असे उत्कृष्ट कार्य केले आहे, भारती विद्यापीठाच्या संशोधनासाठी समर्पित असलेल्या तीन संशोधन संस्थांसह 29 घटक संस्था आहेत.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय बहु-कॅम्पस आणि बहु-अनुशासनात्मक आहे आणि शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करीत आहे. विश्वविद्यालय संशोधनात लक्षणीय कामगिरी करीत आहे.
भारती विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत, अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट अध्यापन-शिक्षण प्रक्रिया आहेत आणि राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय संस्थाचे सामंजस्य करार आहेत.
कोविड तसेच विविध आव्हांनाच्या काळामध्ये भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय सातत्याने देश व राष्ट्रकार्यात समर्पित भावाने कार्यरत आहे. भारती विद्यापीठाची ही ज्ञानगंगा लाखों विद्यार्थ्याना ज्ञानामृत देत त्यांचे पर्यायाने भारत देशाचे भविष्य सातत्याने उज्ज्वल करीत राहील ही खात्री आहे. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयास २८ व्या वर्धापनदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.