Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

किर्लोस्कर हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजची बारावीच्या निकालाची वैभवशाली परंपरा कायम

किर्लोस्कर हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजची बारावीच्या निकालाची वैभवशाली परंपरा कायम

किर्लाेस्करवाडी:  शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, संस्कार व सामाजिक उत्तरदायित्वाच्या जोरावर गुणवत्तापूर्ण शैक्षणिक प्रगतीची मोहोर उमटविणाऱ्या विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या  किर्लोस्कर हायस्कूल अँड ज्युनिअर काॅलेज, किर्लाेस्करवाडी या हायस्कूलने बारावीच्या निकालाची व गुणवत्तेची वैभवशाली परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. 
अनुजा रविंद्र माने  ८९.३३ %   



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ८ जून  रोजी ऑनलाइन जाहीर  करण्यात आला.  बारावी परीक्षेत १०० टक्के उच्चांकी निकाल  प्राप्त करून किर्लोस्कर ज्युनिअर काॅलेजने गरुडभरारी घेतली आहे.

गुणवत्तापूर्ण व उच्चांकी निकाल असा वैभवशाली इतिहास आसणाऱ्या या काॅलेजमध्ये प्रथम क्रमांक अनुजा रविंद्र माने  ८९.३३ %,  द्वितीय क्रमांक साक्षी मोहन पवार ८२.८३%, व तृतीय क्रमांक प्रणव प्रकाश पाटील  ८०.५०% गुण प्राप्त करत मिळवला आहे . या उच्चांकी निकालात ९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, ११ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. अनुजा  माने व प्रणित चौगुले या दोन विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषयात १०० पैकी १०० मार्क प्राप्त झाले आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांना प्रभारी प्राचार्य यु.बी.कुलकर्णी, कनिष्ठ कॉलेज विभागप्रमुख प्रा.सौ.जे. एस. पाटील, वर्गशिक्षक प्रा. जी. यु. कुलकर्णी तसेच सर्व विषय शिक्षक-शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन  संस्थेच्या अध्यक्षा सौ.प्रतिमा किर्लोस्कर, संस्थेचे सर्व विश्वस्त, विद्याधिकारी श्री विवेक कुलकर्णी,  प्रभारी प्राचार्य यु.बी.कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी सौ. सुधा मोहिते यांनी केले. 

संस्थेच्या सक्षम, कर्तृत्ववान व कुटुंबवत्सल नेतृत्वाखाली नव्या प्रोत्साहनात्मक योजना तसेच टाटा टेक्नॉलॉजी व मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण व गुणवत्ता पूर्ण अध्ययन अध्यापन कार्यान्वित केल्यामुळे  किर्लोस्कर काॅलेजची दमदार व नेत्रदीपक वाटचाल सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.