भारती विद्यापीठ : प्रतिक राष्ट्रीयत्वाचे
दि.१५ ऑगस्ट २०२१ - अमोल वंडे / भिलवडी
संपूर्ण भारत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे...प्रत्येक भारतीय घटक
उज्ज्वल भविष्याकरिता आपापल्या परीने
त्यामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न निश्चित करीत आहे.
आज या जगासमोरील अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये भारत आपला अमृतमहोत्सव साजरा
करीत असताना भारती विद्यापीठ परिवाराने हे
अमृतमहोत्सवी वर्ष विविध सामाजिक व राष्ट्र उभारणीस अधिकाधिक प्रेरणादायी उपक्रमांनी
साजरे करण्याचा संकल्प संस्थेचे कर्तुत्वसंपन्न कार्यवाह व भारती विद्यापीठ
विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू मा.ना.डॉ.विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली केला आहे. हा केवळ संकल्प
नसून भारती विद्यापीठ व विश्वविद्यालयाच्या माध्यमातून समाजाच्या मनामनात व
कार्यातून जपलेले व वृद्धिंगत केलेलं राष्ट्रीयत्व आहे.
१९६४ साली संस्थापक डॉ.पतंगराव कदम साहेब यांनी संस्थेचे नामाभिदानच राष्ट्रीयत्वाच्या भारलेल्या भावनेने ‘भारती विद्यापीठ, असे भारतीयत्वाच्या ज्वाजल्य निष्ठेने केले.राष्ट्रउभारणी मध्ये आपणही शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून कार्यरत राहण्याचा निश्चय करून सुवर्णमहोत्सव साजरा करत जगभर पोहचलेली स्वतंत्र भारताला लाखो अभियंते,डॉक्टर्स सह सर्वच क्षेत्रात कार्यरत मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. आदरणीय साहेबांनी ‘गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन’ हे ब्रीद वाक्य सार्थ ठरवत लाखो कुटुंबांचा उत्कर्ष भारती विद्यापीठाच्या माध्यमातून केला आहे.
आज समाजामध्ये विविध संस्था कार्यरत असताना अशा अभिनव पद्धतीने सामाजिक क्षेत्रात
व राष्ट्रास नवउर्जा देण्यास किती हात
पुढे सरसावतात हा प्रश्न असताना, भारती विद्यापीठ सारख्या प्रथितयश, समाजाच्या
सर्व घटकांशी जोडलेल्या संस्थेने घेतलेला निर्णय राष्ट्रीय स्तरावर सर्वांना अनुकरणीय
व प्रेरणादायी असाच आहे.
ना.डॉ.विश्वजीत
कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठाच्या माध्यमातून होत असलेले विधायक
समाजपरिवर्तन हे अत्यंत आश्वासक असून सध्याच्या विपरीत परिस्थितीत दीपस्तंभ ठरावे असेच आहे. आज नवभारत निर्मितीत
कार्यरत असणारा भारती विद्यापीठ परिवार हा राष्ट्रीयत्वाचे प्रतिक आहे. त्यांनी जोपासलेला सामाजिक सेवेचा
वसा त्यांच्या प्रगल्भ नेतृत्वाची साक्ष
आज देतो आहे. त्यांनी भारती विद्यापीठ परिवाराच्या माध्यमातून राष्ट्र कार्यास नेहमीच प्राध्यान्य दिले असून,
हा उपक्रम सर्वांना आदर्शवत आहे. हे धेय्याधिष्टीत, सुसंस्कृत नेतृत्व राज्यच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर कार्यरत
राहतील ही खात्री आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली कार्यरत राहत
असताना राष्ट्र कार्यात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान आज निश्चित देऊन जाते.
आपणां सर्वांस 'भारती'य अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.