Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

कृष्णेच्या प्रचंड प्रवाहाने भिलवडी कृष्णेवरील पूलाला धोका,पूर्वेस उंच समांतर पूलाची गरज

 कृष्णेच्या प्रचंड प्रवाहाने भिलवडी कृष्णेवरील पूलाला धोका,पूर्वेस उंच समांतर पूलाची गरज




भिलवडी : २८/७/२०२१

महापूरामध्ये घरे, व्यवसाय, शेती याचसोबत रस्ते व पूलांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यमार्ग क्र.२५१ वर भिलवडी येथील कृष्णानदी वर  ६० वर्षाहून अधिक काळ सेवेत असणारा पूल धोकादायक स्थितीत असल्याची चाहूल लागली आहे.

सदर समांतर पूलाची मागणी कृषी व सहकार राज्यमंत्री ना.डॉ.विश्वजीत कदम यांनी २०१९ च्या महापूरानंतर विधानसभेत केली असून लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळून काम सुरु होण्याची गरज आहे.

सदैव अवजड वाहतूक असणा-या या पूलावर ४५ फूटावर पाणी येते,पण इतके वर्षे सेवा देणा-या या पूलाला सातत्याने वळणावरील  ६० फूटांहून अधिकच्या प्रचंड प्रवाहाला सामोरे जावे लागत आहे.

२०१६ च्या सावित्री नदीवरील रत्नागिरी पूल दुर्घटनेची आठवण ताजी असतानाच २०१६ ला कराडचा पूल कोसळला,प्रशासनाने सदर भिलवडी पूलाची तांत्रिक पाहणी करुन होणारा धोका टाळावा अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

या भिलवडी पूलाच्या पूर्वेस उंच समांतर पूल वेळीच उभारणे क्रमप्राप्त असून ती काळाचीही गरज आहे, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.