Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

भिलवडीकरांनो.. कोरोना पासून जरा जपायला लागतंय..!

शब्दांकन । मा.दीपक पाटील  / भिलवडी


भिलवडीकरांनो.. जरा जपायला लागतंय..
काका-भाऊ-दादांच्या विचारांचे वारसदार आपण..
गावासाठी कायपण करण्यासाठी तयार आपण..
कोरोनाच्या संकटात जरा थांबायला लागतंय..
भिलवडीकरांनो...जरा जपायला लागतंय...

महापुरापासून रक्षण करणारा घाट आपला..
कुठलंही संकट येऊ दे.. 
साथ देणारा विश्वजीतदादा आपला..
संकटात असणारा प्रत्येक भिलवडीकर आपला...
मग नियम तोडून असं आपल्याच माणसांसनी अडचणीत आणायचं नसतंय.. भिलवडीकरांनो..जरा जपायला लागतंय..

चितळेंच्या लस्सीचा स्वाद आपल्याला चाखायचाय..
ग्रीनपार्क-स्वागतचा तांबडा-पांढरा सुद्धा प्यायचाय..
ओल्डमुंबईची कुल्फी.. डिसल्याचा वडा.. 
मॉडर्नची भेळ सुद्धा खायचीय..
जीवनावश्यक सगळंच हाय.. पण जीवनच आवश्यक असतंय..
भिलवडीकरांनो..जरा जपायला लागतंय..

डॉक्टर्स आशा वर्कर्स पोलिस पत्रकार सगळेच सांगतायत काळजी घ्या..
मास्क वापरा अंतर ठेवा हात धुवा खबरदारी घ्या..
आता आपणच हे जरा गंभीरपणे घ्यायला लागतंय..
भिलवडीकरांनो..जरा जपायला लागतंय..

तुम्ही कोरोनालाच जरा लाइटली घ्यायलाय असं दिसतंय..
मास्क न लावता कट्ट्यावर चर्चा करताना प्रत्येक भिलवडीकर दिसतंय..
मला काय हुतय हे डोक्यातन सपशेल काढायला लागतंय..
मास्क लावून सामाजिक अंतर ठेवाय लागतंय..

कोरोनाच्या गाडीला ब्रेक लावायचा असेल तर...
भिलवडीकरांनो...जरा जपायला लागतंय..

दीपक..❤️ से..

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.