भारती बझारच्या औपचारिक शुभारंभाकरिता स्वप्नाली ताईंसह थोरल्या वहिनीसाहेब भिलवडीत आल्या होत्या. महिला दिनाचं औचित्य साधून आणि कोरोनाचं संकट वाढलं असताना मोजक्या महिलांच्या आणि ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
दवा असर ना करे..तो नजर भी उतारती है..ये माँ है जनाब..हार कहा मानती है..
मा.विजयमाला कदम अर्थात आपल्या सर्वांच्या आईसाहेब..वहिनीसाहेबांच्या रूपाने स्त्रीची अनेक रूपे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळाली...डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या माता रमाईप्रमाणे साहेबांना तेवढ्याच ताकदीने साथ देणाऱ्या वहिनीसाहेब...छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ प्रमाणेच विश्वजीत दादांना जीवनाचे मूलभूत धडे देणाऱ्या आईसाहेब..!
सावित्रीबाईंच्या विचारांचा वसा आणि वारसा त्या भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून चालवत आहेतच.
साहेबांबद्दल बोलताना त्या भावूक झाल्या.. हेलावल्या.. डोळ्यात पाणी आले... आवाजात थोडा कंप आला..पण खंबीरपणे त्यांनी सांगितलं की साहेबांचं प्रत्येक स्वप्न साकार करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत..इथेच त्यांनी आम्हा सर्वांचं मन जिंकलं.
नाती जपण्यात मजा आहे..बंध आयुष्याचे..विणण्यात मजा आहे..जुळलेले सुर..गाण्यात मजा आहे..येताना एकटे आलो असलो तरी..सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे..हे ज्यांना कळलंय.. ते म्हणजे कदम कुटूंबीय..!
आईसाहेबांनी गाडीतून उतरताच साहेबांच्या माघारी माझी जबाबदारी मानून ज्येष्ठ नागरिकांची.. माता भगिनींची.. साहेबांच्या जुन्या कार्यकर्त्यांची.. आपण कसे आहात.. कोरोनाच्या संकटात काळजी घेताय ना.. कोरोनाची लस सुरू झाली का... अशी आस्थेनं चौकशी केली.
भिलवडी आणि परिसरातील ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
स्वप्नालीताईं विषयी काय बोलायचं..बड्या घरची लेक आपल्याशी बोलेल का.. आपल्यात मिसळेल का.. हा आमच्या माता भगिनींचा समज... गैरसमज ठरला.
महापुराच्या काळात आमच्या तमाम माता भगिनींना मी तुमच्यासोबत आहे असं म्हणणाऱ्या स्वप्नाली ताई बघितल्या..ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटूंबांना मदत देताना भावनावश झालेल्या स्वप्नाली ताई आम्ही बघितल्या..महापुरामध्ये मदत करणाऱ्याना मोटिव्हेट करताना आम्ही स्वप्नाली ताईना बघितलंय..!आपल्या वडिलांचा कामाचा प्रचंड व्याप सांभाळताना आम्ही स्वप्नाली ताईंना बघतोय..
कायम हसतमुख आणि कॉन्फिडंट...महिला दिनाच्या निमित्तानं या दोन स्त्रियाचं 'विश्व' रूप पहायला आम्हाला मिळालं. आम्ही कृतार्थ झालो.!
नारी शक्ति है, सम्मान है..नारी गौरव है, अभिमान है..
नारी ने ही ये रचा विधान है..हमारा नतमस्तक इसको प्रणाम है..
नारी शक्ति है, सम्मान है..
कदम से कदम मिलाकर चलना...सैन्य,पराक्रम में पीछे न हटना..
बुलंद हौसलों का परिचय देकर..इंदिरा,कल्पना का हो रहा गान है..
नारी शक्ति है, सम्मान है..
शब्द : सदैव आपलाच : कदम कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा...
- दीपक पाटील / भिलवडी
- दीपक पाटील / भिलवडी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.