साहित्यिक सुभाष कवडे लिखित जांभळमाया पुस्तक प्रकाशित
भिलवडी l ३०/१/२०२१
जांभळमाया आत्मकथनात्मक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सार्वजनिक वाचनालय,भिलवडी येथे संपन्न झाला.
पुस्तक प्रकाशित होणं हा आत्मिक आनंदाचा भाग आहे असं प्रांजळ मत सुभाष कवडे यांनी व्यक्त केले.
सुभाष कवडे सरांच्या संघर्षाचे सार म्हणजे जांभळमाया असं प्रतिपादन कवी प्रदीप पाटील यांनी केले.
मा.अमरसिंह देशमुख यांनी माणदेशातील तत्कालीन परिस्थितीचे व संघर्षाचे चित्रण लेखणात उतरल्याचे नमूद केले,त्याच सोबत "व्यक्त व्हा व अधिकाधिक लिहतं व्हा" असा संदेश त्यांनी आपल्या भाषणात दिला.
उद्योजक गिरीष चितळे यांनी पुस्तक वाचताना वेगळंच आत्मिक समाधान लाभल्याचे सांगितले.
साहित्यिक वैजनाथ महाजन यांनी सुभाष कवडे हे साहित्य क्षेत्रातील आनंदयात्री अाहेत.सत्कार्याचे मागे आभाळाचे हात असतात व विचारांचा वसा व व्रत सृजनाची निर्मिती करते.वास्तवाला भिडल्याशिवाय परिस्थितीचे जाण होत नाही त्याच साठी साहित्यिक गरजेचा आहे असे त्यांनी निरीक्षण नोंदवले.
माजी जि.प.अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित तर उद्योजक मा.गिरीष चितळे यांच्या अध्यक्षतेखाली,साहित्यिक वैजनाथ महाजन,कवी प्रदीप पाटील,प्रा.संजय ठिगळे यांच्या हस्ते तर स्नेहीजनांच्या उपस्थितीत पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल मोहिते यांनी व सूत्रसंचालन शरद जाधव यांनी तर अाभार डी.आर.कदम यांनी मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.