Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

रामानंदनगर येथे व्याख्यानमाला व कवी संमेलन

रामानंदनगर ता.  पलूस येथे व्याख्यानमाला व कवी संमेलनाचे आयोजन

पलूस l दि.२८/१/२०२१
        
      समाजवादी प्रबोधिनी, लोकशाही वाचवा कृतीशील विचार मंच पलुस, श्नी समर्थ साहित्य,कला,क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ पलुस व व्ही.वाय.(आबा) पाटील समाज प्रबोधन अँकँडमी नागराळे यांचे संयुक्त विद्दमाने रामानंदनगर येथे दि २८जानेनारी  पासुन व्याख्यानमाला व कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
      आचार्य शांताराम बापू गरुड जयंती व शहिद कॉ.गोविंद पानसरे शहिद दिनानिमित्त होणा-या आचार्य शांतारामबापू गरुड व्याख्यानमालेत दि. २८ जानेवारी रोजी "नवे शैक्षणिक धोरण २०२०" या विषयावर मा. प्रसाद कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. दि. २९ जानेवारी रोजी कॉ. मारुती शिरतोडे यांचे "आद्दक्रांतीवीर राजे उमाजी नाईक जीवन कार्य " या विषयावर  व्याख्यान  होणार आहे. दि.३० जानेवारी मा. अँड. के.डी.शिंदे यांचे "दिल्लीतील शेतकरी अंदोलन व शेतकरी कामगार विरोधी कायदे" या विषयावर  सायंकाळी ५ वाजता व्याख्यान होणार आहेत.
   हे व्याख्यान आद्दक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र,  डॉ.अमोल पवार,  श्नी धोंडाराज महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या. पलुस यांच्या सौजन्याने होत आहे.
       दि. ३१ जानेवारी रोजी श्नी समर्थ साहित्य,कला,क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळ पलुस यांचे वतीने कामगार भवन, रामानंदनगर ता.पलूस येथे दुपारी १.०० वा १८ वे परिवर्तन साहित्य संमेलन अंतर्गत बहारदार "कवी संमेलन" आयोजित केले आहे. 

कवी संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिध्द कथाकथनकार मा. विश्वनाथ गायकवाड, विटा हे असुन उद्घाटक कथाकथनकार मा. हिम्मत पाटील,नागठाणे व स्वागताध्यक्ष कवी संदिप नाझरे,आमणापूर हे आहेत. अशी माहीती संयोजक समितीच्या वतीने व्ही.वाय.(आबा) पाटील, कवी किरण शिंदे, डॉ.अमोल पवार, कवी संदीप नाझरे, प्रा. रविंद्र येवले, संजीव तोडकर, कुमार गायकवाड, जयवंत मोहिते,जितेंद्र कांबळे,माधवी शिंदे, सुनिता कोळी यांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.