महाराष्ट्र राज्याचे सहकार व कृषी राज्य मंत्री मा.ना.डॉ.विश्वजित कदम साहेब यांनी फेसाटीकार तथा युवा साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते, जतच्या साहित्य क्षेत्रातील भूषण मा.नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठामध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी भारती विद्यापीठामध्ये 'वरिष्ठ लिपिक' व विचार भारती या नियतकालिकाच्या 'सहसंपादक' पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
हे नियुक्ती पत्र जत तालुक्याचे विद्यमान आमदार मा. विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या शुभहस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदान करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.