Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

बापू - विनम्र अभिवादन

ll बापू - विनम्र अभिवादन ll


कृष्णाकाठ न्यूज /अमोल वंडे 

भिलवडी व परिसरातील जेष्ठ व्यक्तिमत्व श्री.आण्णा पांडुरंग वावरे अर्थात "बापू" या आदरवचनाने परिचित असलेल्या आपल्या आण्णा बापूंचे रविवार दि.७ जून २०२० दुख:द निधन झाले.

बापू म्हणजे नेहमी शुभ्र सदरा,धोतर,डोक्यावर पांढरी टोपी प्रसंगी रुबाबदार फेटा,डोळ्यावर चष्मा,हातात काटी असा बघताक्षणी आदरभाव मनात यावा असं  भारदस्त व्यक्तिमत्व.

बापूंचे जीवन आजच्या पिढीला आदर्शवत असेच होते.   क्षितीज समूहाच्या वतीने त्यांना नुकताच समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. भिलवडी व धनगर समाजातील एक जुणे जाणते व्यक्तिमत्व हरपल्याने फार मोठी अनुभवाची शिदोरी हरवली आहे. बापूंचा जन्म १९३० च्या दरम्यानचा..अतिशय कष्टातून त्यांनी समाजालाच कुटुंब समजून समाजाप्रति जबाबदारी निभावली.

सुरवातीपासून ओवीकार म्हणून ते सर्वत्र विख्यात होते.यातून त्यांची सामाजिक व वैचारीक जडणघडण झाली. समाजातील अनेक कुटुंबांतील वादविवाद सामोपचाराने ते सोडवायचे...लोकांचाही त्यांच्यावर तितकाच विश्वास होता.स्वत: कमी शिकलेले असूनही सर्वसामान्यांन शेतकरी,कष्टकरी लोकांच्या जिवनात शिक्षण बदल घडवू शकते असं त्यांच ठाम मत होतं..त्यासाठी अधिकाधिक शिक्षित व्हावेत असा त्यांचा सर्वांना आग्रह असायचा.अनेक कुटुंबे सावरण्यामधे त्यांना अडीअडचणीच्या काळात आधार देण्यामधे ते कधिही कमी पडले नाहीत.

बापूंच्या पश्चात आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्यरत असलेले ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बापूंच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधिही न भरुन येणारी आहे.त्यांच्या आठवणी व मार्गदर्शन सदैव प्रेरणादायी आहे.

कृष्णाकाठ परिवारातर्फे त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.