“ भिलवडी कृष्णेवरील समांतर पुलाचा मुद्दा थेट विधानसभेत – धन्यवाद बाळासाहेब ”
- अमोल वंडे / भिलवडी - सांगली l दि.२०/१२/२०१९
नागपूर अधिवेशनामध्ये पलूस – कडेगाव चे दमदार आमदार मा.आ.डॉ.विश्वजीत कदम अर्थात आपले बाळासाहेब यांनी कृष्णाकाठ महापूर व खराब रस्ते पूल यांचा प्रश्न औचित्याचा मुद्दा म्हणून मांडला.
महापुराचे पाणी वाढत असताना त्यादिवशी राज्यमार्ग क्र.२५१ वरील भिलवडी पुलावर मध्यरात्री २.५७ मि. पाणी आले असताना पुलाला ४५ फुट पाण्याचा वेगवान प्रवाहाचे धक्के बसून हादरे बसत असल्याचे जाणवत होते...याचे माझ्यासहित आणखी काही ग्रामस्थ साक्षीदार हि होते.सावित्री पुलाची दुर्घटना,कराड पुलाची दुर्घटना यांचा अनुभव महाराष्ट्राने नुकताच घेतला होता.
कृष्णेच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली असताना रविवार दि.४ ऑगस्ट २०१९ रोजी स.११.०० वा.लोकांच्या सुरक्षेसंदर्भात बाळासाहेबांनी भिलवडी ला भेट दिली व उपाययोजनांचा आढावा घेतला व परिस्थितीची पाहणी केली.त्यावेळी अजून काही अडचण आहे अस बाळासाहेबांनी विचारताच सदर मुद्दा बाळासाहेबांच्या निदर्शनास आणून दिला, व तुम्ही लक्ष घातलेच पाहिजे हा आग्रह हि सामजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या जवळ केला, बाळासाहेबांनीही त्यावर पुरानंतर उपाययोजना करू असं सांगितले.
महापूर येऊन गेला एका दिवसाच्या पाहणी नंतर प्रशासनाने पुलाला वाहतूकी साठी खुलेही केले,पण धोका टळला नाही हि जाणीव मनात नेहमी होती.ज्याप्रमाणे कराड ला आधीच नवीन पूल बांधला त्याच धर्तीवर इ.स.१९६० पासून प्रचंड वाहतुकीचा ताण सहन करत असलेल्या भिलवडी-अंकलखोप पुलाला समांतर नवीन पुलाची मागणी बाळासाहेबांनी थेट विधानसभेत करून आपल्या कर्तव्यदक्षतेची व कृष्णाकाठ च्या पालकत्वाची प्रचीती दिली.
बाळासाहेब,आपले प्रेरणास्थान स्व.डॉ.पतंगराव कदम साहेबांच्या प्रचंड प्रयत्नातून ३ तालुक्यांची सीमा असणारा सुखवाडी-तुंग पुलाचा प्रश्न मार्गी लागला व विकासाची नवी दारे खुली झाली.त्याच प्रमाणे याही पुलाच्या उभारणीचे शुभकार्य आपल्याच हातून लवकरात लवकर निश्चित होईल ही खात्री आहे.
बाळासाहेब,आपले प्रेरणास्थान स्व.डॉ.पतंगराव कदम साहेबांच्या प्रचंड प्रयत्नातून ३ तालुक्यांची सीमा असणारा सुखवाडी-तुंग पुलाचा प्रश्न मार्गी लागला व विकासाची नवी दारे खुली झाली.त्याच प्रमाणे याही पुलाच्या उभारणीचे शुभकार्य आपल्याच हातून लवकरात लवकर निश्चित होईल ही खात्री आहे.
भविष्यातील धोक्याची वेळीच जाणीव होऊन आपण नागरिकांची घेत असलेली काळजी व मतदारसंघाला विकासात अग्रेसर ठेवण्याची असलेली आपली तळमळ आमच्या साठी प्रेरणादायी आहे..बाळासाहेब पुन्हा एकदा आपले मन:पूर्वक धन्यवाद..!" पुन्हा एकदा आपल्या ऋणात कृष्णाकाठ... आपल्या ऋणात कृष्णाकाठ...!"
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.