Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी मध्ये राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न


डी. वाय.  पाटील अभियांत्रिकी मध्ये राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न 

" भारत सरकारच्या योजन अंतर्गत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागा तर्फे आयोजन"

कृष्णाकाठ न्यूज | दि. ३१/८/२०२३ 

डी. वाय.  पाटील अभियांत्रिकी मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागा तर्फे दोन दिवसीय "पॅरलल प्रोग्रामिंग ऑन सीपीयू अँड जीपीयु  युजिंग ओपन एमपी" या विषयावर  कार्यशाळा घ्येण्यात आली .

ही  कार्यशाळा राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन  ह्या भारत सरकारच्या योजने अंतर्गत घेण्यात आली .  यासाठी तज्ञ् म्हणून श्री  मंदार गुरव हे इंटेल सर्टिफाइड ट्रेनर होते . ते  आयटी बॉम्बे येथून डॉक्टरेट पदवी मिळालेले आहेत. 

तिसऱ्या व अंतिम वर्षाच्या सुमारे १४० विध्यार्थ्यानी या कार्यशाळेत भाग घेतला.  या कार्यक्रमाचे  नियोजन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागा प्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी केले .  

यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज  पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन मिळाले .



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.