Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

औदुंबर येथे कृष्णाकाठ तर्फे योग प्रशिक्षण संपन्न

औदुंबर येथे कृष्णाकाठ तर्फे योग प्रशिक्षण संपन्न 


सांगली | २१/६/२०२१ 

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून समाजामध्ये व्यायामाचे महत्व वाढीस लागावे व निसर्ग सानिध्याचे  महत्व अधोरेखित व्हावे या उद्देशाने कृष्णाकाठ फौंडेशन,भिलवडी च्या सदस्यांकरिता योग प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. उपक्रमास भिलवडी,अंकलखोप,औदुंबर,माळवाडी,खंडोबाचीवाडी परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सदर योग प्रशिक्षण कृष्णाकाठचे सदस्य योगप्रशिक्षक किरण पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली  श्री क्षेत्र औदुंबर येथे संपन्न झाले.सदर उपक्रमाअंतर्गत सातत्याने योग आधारित प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार असून समाजामध्ये योग,निसर्ग,पर्यावरण याविषयी जागृती करण्यात येणार आहे.

कोरोना परिस्थिती नंतर व्यायामाचे महत्व सर्वांनाच अवगत होत असून याच सोबत योगा,मनस्वास्थ्य,निसर्ग सहवास याकरिता प्रबोधनाचे कार्य कृष्णाकाठच्या माध्यमातून सुरु आहे व प्रशासनाच्या सहकार्याने उत्तम शारीरिक व मन:स्वास्थ्यासाठी पूर्णवेळ योगप्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा मानस असल्याचे  कृष्णाकाठ फौंडेशन चे अध्यक्ष अमोल वंडे यांनी उपक्रमप्रसंगी सांगितले.  

या उपक्रमाकरिता वासुदेव जोशी,संतोष जोशी यांच्या सह कृष्णाकाठचे सदस्य वैभव कवडे, मितल कोष्टी,निलेश उंडे,साहिल तापेकरी,सागर ऐतवडे,महेश परीट,सचिन नावडे,विजय चोपडे व विजयकुमार मोरे अनिकेत कोष्टी,अभय मगदूम आदी सहभागी होते.श्री गणेश मंगलकार्यालय उपलब्ध करून देणारे व्यवस्थापक चिंतामणी जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.