भारताने वेगवेगळ्या क्षेत्रात केलेली प्रगती अभिमानास्पद - मा. विजयमाला कदम
सांगली: भारताने वेगवेगळ्या क्षेत्रात जी प्रगती केली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. देशाच्या सर्वागीण प्रगतीसाठी देशातील तरुणाईने हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे.गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन डॉ. पतंगराव कदम साहेबांनी केलेल्या कार्याचा तरुणाईने आदर्श घ्यावा. विशेषतः डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने वेगवेगळ्या क्षेत्रात जी प्रगती केली याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा.विजयमाला कदम तथा वहिनी साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.प्रारंभी उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. प्रास्ताविकपर भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, भारताचे सार्वभौमत्व हा भारताचा आत्मा आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाने देशहिताचा विचार करून कार्यरत राहण्याची गरज आहे.
मार्गदर्शनपर भाषणात मा. विजयमाला कदम तथा वहिनी साहेब म्हणाल्या की, देशात सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभा पाटील यांनी केले. संविधानाच्या सरनाम्याचे वाचन प्रा. रुपाली कांबळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमास कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. तानाजी सावंत
शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. पद्माकर जगदाळे, शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक प्रा. अमर तुपे त्याचबरोबर वरिष्ठ, कनिष्ठ व व्यवसायिक विभागाचे प्राध्यापक, सेवक वर्ग आदी उपस्थित होते .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.