Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

कृष्णाकाठ तर्फे डॉ.डी.जी.कणसे (सर) कार्यगौरव विशेषांक - नक्की वाचा

कृष्णाकाठ तर्फे डॉ.डी.जी.कणसे (सर) कार्यगौरव विशेषांक
कृष्णाकाठ सोशल फाउंडेशन भिलवडी-सांगली या संस्थेच्या माध्यमातून गेली सात वर्षांहूनही अधिक काळ  आम्ही शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात शासन नोंदणीकृत सेवाभावी संस्था म्हणून कार्यरत आहोत.

 स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या प्रेरणेतून  कार्यरत असताना शिक्षण व समाज जाणिवांचा प्रसार समाजामध्ये अधिकाधिक  व्हावा  यासाठी  आम्ही नेहमीच  विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहिलो आहोत. शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन  अधिकाधिक विधायक व्हावा  विद्यार्थ्यांना व या समाजाला यशस्वी व्यक्तींच्या  संघर्षाची  व कर्तुत्वाची  माहिती मिळावी म्हणून संस्थेच्या माध्यमातून “गौरव गुणवंतांचा.. गौरव कर्तुत्वाचा” या  विश्वसंवाद ई-विशेषांकाची आम्ही निर्मिती करीत आहोत.

स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब  यांना प्रेरणास्थान मानून व ना.डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ संस्थेत कार्यरत असणारे  भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठ सिनेट चे सदस्य  डॉ. डी. जी. कणसे  सर यांना नुकताच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तर्फे २०१९-२० चा प्रथम “गुणवंत प्राचार्य पुरस्कार” प्राप्त झाला, त्या प्रित्यर्थ  हा विशेषांक म्हणजे सरांचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्याचा केलेला हा एक छोटासा प्रयत्न.

जन्मगाव सोनसळ पासूनच सरांना स्व.डॉ.पतंगराव कदम साहेबांचे सानिध्य लाभले.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून साहेबांच्या आशीर्वादाने शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. प्राध्यापक, संशोधक, पदाधिकारी ते उत्तम प्रशासक असा त्यांचा प्रवास निश्चितच स्पृहणीय असाच आहे.सरांनी आजपर्यंत केलेला प्रवास,त्यांनी घेतलेले निर्णय,पार पडलेल्या जबाबदाऱ्या,विविध व्यक्तीशी असलेले स्नेहबंध याचे शब्दचित्रण आपणास निश्चितच नवी दिशा देईल यात शंका नाही.

भावी काळामध्ये सरांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये अधिकाधिक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्या माध्यमातून पार पाडाव्यात या सदिच्छा व “स्नेह वृद्धिंगत व्हावा या अपेक्षेसहित वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा…!

 कृष्णाकाठ फौंडेशनच्या या विशेषांकासाठी अतिशय कमी कालावधीत विविध मान्यवरांनी आपल्या भावना आमच्यापर्यंत लिखित स्वरूपात पोहोचविल्या  त्यांचे मनःपूर्वक आभार. covid-19 च्या लॉक डाऊन पार्श्वभूमीवर  आम्ही ई- विशेषांकाचा केलेला प्रयत्न  नक्कीच पथदर्शी  व प्रेरणादायी असेल अशी खात्री आहे..
सर, तुम्हाला पुनश्च एकदा वाढदिवसाच्या आरोग्यदायी , किर्तीदायी ,यशदायी मन:पूर्वक शुभेच्छा..!      “वाढदिवस अभिष्टचिंतन”  

ll कार्यगौरव विशेषांक ll
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य,भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली चे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे (सर) यांना शिवाजी विद्यापीठाचा गुणवंत प्राचार्य पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल कार्यगौरव विशेषांक..!
 वरील लिंक वर क्लिक करुन नक्की वाचा.
    
   -  अमोल वंडे - संस्थापक / मुख्य संपादक


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.