कोरोना ¦तुमच्या गावात मुंबई पुण्यासह बाहेरुन प्रवासी आलेत त्यांना "हे" सांगाच - नक्की वाचा व सर्वांना शेअर करा. ¦ Corona - Migrant Suggestion.
गावी येणाऱ्या मुळ नागरीकांनी खालील गोष्टी पाळायलाच हव्यात, म्हणून करोना व्हायरस चा प्रसार नक्कीच थांबेल.
१)चोरासारखे नका येऊ.
२)राजरोसपणे परवानगी घेऊन या.
३)गाव आमच तुमच सर्वांचे आहे,तुम्ही नियम पाळा, नक्कीच तुमचे स्वागत आहे.
४)फक्त १५ दिवस अलगीकरण पाळा (कोरंनटाईन रहा)
५)अगदी घरातील कोणालाही स्पर्श करु नका, वस्तू एकत्रित वापरु नका.
६)तुम्हाला किराणा, भाजीपाला, धान्याची गरज पडली तर फोन करुन सांगा, किंवा लांबूनच हाका मारा.
७)अलगीकरणात राहीले म्हणजे गावातील लोंकाना तुमचा अभिमानच वाटेल.
८)तुम्ही अलगीकरणात ( कोरंनटाईन) राहीले तर तुम्हाला हवी ती मदत गावकरी करतील, अगदी पैसे नसले तरी.
९)तुम्ही गावाची व गावकऱ्यांची अलग राहुन काळजी घ्यावी, गावकरी तुम्हाला नक्कीच मदत करतील.
१०)लोकांत फिरुन आपला आपमान करुन घेऊ नका, गावाचे जबाबदार नागरीक बना.
११)आपल्याकडे किंवा शेजारच्या कडे बाहेरगावाहून कोणी आले तर लगेचच गावात सर्वांना कळवा.
१२) भल्या भल्यांना करोना झाला व त्याने मृत्यू झाल्याचे दिसून येते आहे, आपला पाहुणा किंवा बाहेर गावावरून येणारा घरातील सदस्य यांना करोना होणारच नाही हा गैरसमज डोक्यातून काढून टाका.
१३) बाहेरगावाहून येणारा किंवा अनोळखी व्यक्ती ला करोना झालाय असे समजूनच काळजी घ्या.
या गोष्टी चे पालन केले तर करोना व्हायरस आपल्या गावात प्रवेश करूच शकणार नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.