Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

कॅन्सर होऊच नये असं वाटतंय - तर मग नक्की वाचाच | MahaOrganics.in

कॅन्सर होऊच नये असं वाटतंय - तर मग नक्की वाचाच | MahaOrganics.in


आपल्याला कर्करोगाबद्दल व त्याच्या अनेक प्रकारांबद्दल माहिती असून चालत नाही, तर ज्या कारणांमुळे किंवा घटकांमुळे कर्करोग उद्भवतो, त्यांच्यापासून दूर राहून तो न होण्यासाठी जे प्रयत्न करायला हवेत त्या प्रतिबंधक घटक किंवा कारणांची सखोल माहिती असणे फारच गरजेचे आहे. कर्करोगाला रोखताना किंवा त्याला पायबंद घालताना एकदा त्याच्या पद्धती नजरेखालून घालायला हव्यात, प्राथमिक, दुय्यम किंवा तृतीय स्तरावर कर्करोगाचा प्रतिबंध केला जाऊ शकतो.


पल्याला कर्करोगाबद्दल व त्याच्या अनेक प्रकारांबद्दल माहिती असून चालत नाही, तर ज्या कारणांमुळे किंवा घटकांमुळे कर्करोग उद्भवतो, त्यांच्यापासून दूर राहून तो न होण्यासाठी जे प्रयत्न करायला हवेत त्या प्रतिबंधक घटक किंवा कारणांची सखोल माहिती असणे फारच गरजेचे आहे. कर्करोगाला रोखताना किंवा त्याला पायबंद घालताना एकदा त्याच्या पद्धती नजरेखालून घालायला हव्यात, प्राथमिक, दुय्यम किंवा तृतीय स्तरावर कर्करोगाचा प्रतिबंध केला जाऊ शकतो. ज्या कर्करोगजन्य पदार्थापासून कर्करोग होतो अशापासून स्वत:ला दूर ठेवणे, जेणेकरून कर्करोगाच्या निर्मितीसाठीची वा वाढीची प्रक्रिया सुरू होणार नाही किंवा त्या प्रक्रियेला पोषक वातावरण प्राप्त होणार नाही. या कर्करोग आरंभाच्याचाच खबरदारीला ‘प्राथमिक कर्करोग प्रतिबंध’ म्हटले जाते. दुय्यम स्तराच्या प्रतिबंधासाठी संशयित किंवा विशिष्ट वयोगटातील व्यक्तींची छाननी स्कॅनिंग करून कर्करोग वाढण्याआधीच प्राधान्याने लवकरच रोगनिदान किंवा कर्करोगाचा शोध घेतला जातो. या पद्धतीने अगदी सुरुवातीच्या पायरीवर किंवा टप्प्यावर असलेल्या कर्करोगाच्या तातडीच्या निदानाने उपचार गुणकारी व लाभदायी ठरण्यास मदत होते. याचाच अर्थ असा की कुठल्याही प्रकारचा त्रास, गाठ अथवा कर्करोगाची शंका नसताना ठराविक कालमर्यादेनुसार किंवा वयोमानानुसार प्रत्येकाने आपली शारीरिक तपासणी करून घेणे म्हणजेच छाननी कार्यक्रम राबविण्यास मदत करून स्वत:चीच मदत करणे होय. एकदा का कर्करोग झाला आहे हे तुकडा तपासल्यावर अथवा इतर चाचण्या केल्यावर निश्चित होते तेव्हा त्यावर त्याच्या पायरीनुसार वा टप्प्यानुसार उपचार करणे आणि विनाकारण उद्भवणाऱ्या दुष्परिणामांना रोखणे किंवा ज्याला जीवनदान मिळू शकते अशांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणे हे ‘तृतीय स्तराच्या कर्करोग प्रतिबंधात’ मोडते.


कर्करोगाचा प्रतिबंध करताना एका निश्चित ध्येयाने, सारे काही केले जाते आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजेत्या व्यक्ती किंवा रुग्णाला न्याय देऊन चांगले आयुष्य देता येते. सध्या असलेले कर्करोग मृत्यूचे प्रमाण हे अर्ध्याने घटविणे हे धोरण अमेरिकेत स्वीकारले गेले. याप्रमाणे समाजात जनजागरण कार्यक्रम राबविताना काही निकष जरूर लावले जातात. केवळ दररोजच्या खाद्यपदार्थातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण घटवून तंतू पदार्थांचे प्रमाण वाढविल्याने ८% मृत्यूचे प्रमाण घटते. ८ ते १५% मृत्यूचे प्रमाण घटल्याने धूम्रपान सोडणाऱ्यांमध्ये आढळले आहे. अल्पमुदतीत प्रारंभीच्या अवस्थेत विविध चाचण्या, छाननी कार्यक्रमाद्वारे कर्करोगाचे निदान केल्याने ३% प्रमाणात मृत्यूचे दर घटतात आणि योग्यवेळी योग्य तज्ज्ञउपचार केल्याने १० ते २६% प्रमाणात ते रोग्यांना जीवनदायी ठरते. प्रतिबंधक कार्यक्रमाचा फायदा झाल्याचे केवळ मृत्यूचे प्रमाण घटणे हे एकच प्रमाण असू शकत नाही, पण ढोबळमानाने कर्करोग नियंत्रण कार्यवाहीची प्रचिती येऊ शकते.

अमेरिकेत कर्करोग होण्याचा दर ठरविला जातो. (एक लाखाच्या लोकसंख्येत किती लोकांना आजार जडतो) वय, लिंग व जमात (रेस) आदीचाही विचार केला जातो. मृत्यूचे प्रमाण पडताळताना त्या विभागातील मृत्यूनोंदणी दाखल्याचा उपयोग होतो. कर्करोगाचा आरंभ आणि त्याचे निदान या दोहोतील अंतर हे १० ते ३० वर्षांपर्यंत असू शकते. त्यामुळे तिकडच्या भागाची जीवनसरणी आणि लोकातील घातक घटक उदा. धूम्रपानाचा दर, किरणांशी संपर्क, खानपान सवयी व छाननी किंवा निदानासाठी उपलब्ध असलेल्या पॅप स्मियर किंवा स्तन क्ष-किरण (मॅमोग्राफी) आदींची उपयुक्तता किंवा वापर हे प्रतिबंधात्मक कामासाठी जास्त सूचक व उद्बोधक ठरतात. विविध गटांचा अभ्यास करून त्याचा निष्कर्ष काढला जातो व त्याप्रमाणे समाजात त्या-त्या परिस्थितीत वाढीस लागणाऱ्या कर्करोगास प्रतिबंध घालता येतो.

प्राथमिक प्रतिबंध : कर्करोगाची किंवा कर्करोग उद्भवण्याची कारणे विविध व विस्तृत आहेत. एकापेक्षा अनेक घटक किंवा कर्करोगजन्य पदार्थ हे त्या व्यक्तीच्या सहवासातील वातावरणातील घटकांवर क्रिया-प्रतिक्रिया करतात हे निर्विवाद सत्य आहे. वातावरणातील दोष हा जास्त प्रभावी व शक्तिशाली ठरतो. उदा. विविध देशात किंवा भिन्न भौगोलिक भागात अन्ननलिकेच्या कर्करोगात भिन्नता आढळते त्याचे कारण एक असूनही, त्याचे दुसरे कारण असे की, कालमानाप्रममाणेही कधी फुफ्फुसाचे कर्करोग वाढतात तर कधी पोटाचे कर्करोग वाढतात, मानवी जीन्सच्या बदलानेही वेगाने कर्करोग फैलतोय आणि त्याला स्थलांतर (एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात) देखील पूरक ठरते. पर्यायाने एकूण कर्करोगांपैकी ३/४ कर्करोग हे जवळजवळ वातावरणातील बदलामुळेच होतात. त्यामुळे फक्त १/३ प्रमाणात तेही अस्तित्वात असलेल्या प्रतिबंधात्मक धोरणानुसार आणि उपलब्ध ज्ञानानुसार कर्करोग प्रतिबंध केला जाऊ शकतो.

तंबाखू : तंबाखू किंवा धूम्रपानामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होतो. हा संबंध १९५० मध्येच प्रस्थापित करण्यात आला आहे. आता धूम्रपान करणाऱ्यांमध्ये न करणाऱ्यांच्या दहापटीने कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते. जे सिगारेटच्या प्रतिदिनी ओढल्या जाणाऱ्या दरावर अधिकच अवलंबून असते. सिगारेट ओढण्याने घशाचा कर्करोग (आठ पटीत), तोंडाचा व श्वासनलिकेच्या आरंभाचा कर्करोग (चार पटीत) तर मूत्राशय व पॅन्क्रियाजचा कर्करोग दोन पटीने होतो. पाईप (चिलीम) किंवा सिगार ओढणाऱ्यांना तर अधिकच धोका संभवतो. जे सिगारेट ओढत नाहीत, पण सिगारेट ओढणाऱ्याच्या संपर्कात राहतात, अशांना धूर नाकारत गेल्याने कर्करोग होऊ शकतो. सिगारेटमधील टारमुळे ३०% प्रमाणात कर्करोग होतो. स्त्रियांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्यात कर्करोगाचे प्रमाण कमीच असते. धूम्रपानाच्या सवयी अलिकडे बदलून महिलांमध्ये गेल्या दशकात हे प्रमाण वाढले आहे आणि चित्र पालटण्याची भीती आहे. २००० सालापर्यंत तंबाखू सेवनाचे प्रमाण घटल्यास कर्करोगाचे प्रमाण घटण्याची आशा आहे, याचे आणखीन एक चांगले कारण म्हणजे शासनाचे गुटखाविरोधी धोरण जे तरुणांना कर्करोगापासून वाचवू शकते.

मद्यपान : इथाइल अल्कोहोल अतिप्रमाणात पिण्याने यकृताचा कर्करोग तर होतोच, पण तोंडाचा, घशाचा (अन्ननलिकेचा) ही कर्करोग होतो. दारू पिणारे बहुतांशी प्रमाणात सिगारेट किंवा तंबाखूचे शौकीन असतात, हे अधिक घातक ठरते. मद्यपान व धूम्रपान हे एकमेकांना पूरक असल्याने असे पदार्थ टाळण्यानेच कर्करोगाला आळा घालणे शक्य आहे.

रेडिएशन (लाईट): रेडियम व इतर किरणांच्या संपर्कामुळे त्वचेचा कर्करोग बळावतो. क्ष-किरण (एक्स-रे), अल्फा, बीटा आणि गॅमा किरणे ही जास्त घातक असतात. क्ष-किरणांनी इलाज करताना, क्षयासाठी वारंवार क्ष-किरण तपासणी करताना, रक्तक्षयावर क्ष-किरणांनी उपचार करताना, अणुबॉम्बचा भयानक परिणाम भोगलेल्या हिरोशिमा व नागासाकी येथील वाचलेल्या लोकांचा अभ्यास करताना रेडिएशनचे निदर्शनास आलेले दुष्परिणाम, युरेनियम खाणीतील कामगार किंवा वैद्यक क्षेत्रात अशा विभागात काम करणाऱ्यात कर्करोग उद्भवू शकतो.

अन्नपदार्थ : खाद्यपदार्थ व कर्करोग यांचा घनिष्ट संबंध आहे. अतिस्निग्ध (चरबीयुक्त) पदार्थांचे सेवन केल्याने स्तन, मोठ्या आतड्याचे कर्करोग होतात. पण त्याउलट कमी चिकणे पदार्थ व जास्तीत जास्त पालेभाज्या व फळांचे सेवन कर्करोगाचे प्रमाण घटवते. ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्वेही कर्करोग प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरतात.
औषधे : वैद्यकीय कारणास्तव घेतलेली औषधे ही कर्करोगास आमंत्रित करू शकतात. गर्भनिरोधक गोळ्यांमुळेही स्तन व स्त्री-मूत्रजनन अवयवांचा कर्करोग उद्भवतो. गर्भावस्थेत घेतलेल्या औषधांमुळेही त्यांच्या मुलाबाळांनाही कर्करोगाचा त्रास होऊ शकतो.
कारखाने, खाणी आदी क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही विविध कर्करोगांना सामोरे जावे लागते. खते, बी-बियाण्यांसाठी वापरलेली रसायने, पाण्यातील दूषित घटक (हायड्रोकार्बन), टाकाऊ रसायने यापासूनही धोका संभवतो.

दुय्यम प्रतिबंध : प्राथमिक प्रतिबंध करताना अनेक अडचणी येतात म्हणून या दुय्यम प्रतिबंधाला जास्त महत्त्व दिले जाते आणि लवकर रोगनिदान करून फुफ्फुस, स्तन, गर्भाशयाच्या प्रवेशाचा भाग , मूत्राशय, मोठी आतडी, अंडकोष, प्रोस्टेट व  तोंडाचे कर्करोग हे तातडीच्या उपचारामुळे बरे करणे सोपे जाऊ शकते. परिणामकारक छाननी  हाच या मागचा योग्य उपाय ठरू शकतो. यावेळी ती चाचणी साधी-सोपी, कमी खर्चिक, रुग्णांना कमी त्रासदायक, स्वीकारक, कमी दुष्परिणामकारक आणि कुठल्याही पातळीवर करता येणारी असावी लागते, असे म्हणणे सोपे आहे. पण प्रत्यक्षात ते धोरण राबविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. गर्भाशयाच्या कर्करोगात पिशवीच्या खालच्या भागातील स्त्राव (पॅपस्मीअर) तपासून किंवा स्तन कर्करोग हे मॅमोग्राफी (स्तन-क्ष-किरण) करून अल्पमुदतीत प्राथमिक अवस्थेतच शोधला जाऊ शकतो. पण रुग्णाची सामाजिक व आर्थिक परिस्थितीही त्याला आड येते आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना फोल ठरतात.

अधिक महिती करिता :
श्री. महेश वंडे   - संस्थापक  महा ऑर्गेनिक 
टीम महा ओर्गनिक - महाराष्ट्र  | +91  9595 148 909 ़