ll कृष्णाकाठ - जिल्हास्तरीय मुक्त निबंध स्पर्धा ll
कृष्णाकाठावरील युवाशक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधणे, या उद्देशाने ‘कृष्णाकाठ सोशल फौंडेशन , भिलवडी - सांगली ’हि संस्था २०१३ पासून कार्यरत असून शैक्षणिक , प्रशासन, पर्यावरण यासंदर्भात आजच्या युवापिढीसमोरील आव्हाने लक्षात घेत, समाजाच्या सर्व कृतिशील घटकांना एकत्र आणून विधायक उपक्रमांची आखणी ‘कृष्णाकाठ सोशल फौंडेशन’ करीत आहे.
बालदिनानिमित्त कृष्णाकाठच्या विद्यार्थ्यांचे भावविश्व समृध्द करण्याकरिता - कृष्णाकाठ सोशल फौंडेशन, भिलवडी – सांगली तर्फे जिल्हास्तरीय मुक्त निबंध स्पर्धेचे अायोजन करण्यात आले आहे.
प्रवेश विनामूल्य
निबंध स्पर्धा विषय : मी अनुभवलेला महापूर
नियम :
१) सदर स्पर्धेकरिता विद्यार्थ्याने स्वहस्ताक्षरात निबंध लेखन करायचे असून त्यासोबत स्वत:चे नाव, पत्ता,इयत्ता,शाळा व संपर्क क्रमांक नमूद करावयाचा आहे .
२) निबंध पोस्टाद्वारे खालील पत्त्यावर दि.२४ /११/२०१९ ( वाढवलेली मुदत ) पर्यंत पोहचतील असे पाठवावे.
३)तज्ञ परीक्षाकांद्वारे स्पर्धेचे विजेते संस्थेच्या संकेतस्थळावर ३०/११/२०१९ रोजी घोषित केले जातील.
४.गट : ४थी ते ७ वी व ८ वी ते १० वी | बक्षीस : प्रमाणपत्र व शालेय साहित्य
पत्ता: C/O अमोल वंडे ,
कृष्णाकाठ सोशल फौंडेशन,भिलवडी.
ता.पलूस, जि-सांगली – 416 303
कृष्णाकाठचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास
अधिक माहितीकरिता www.Krushnakath.com
(स्पर्धेचे अंतिम अधिकार संस्थेकडे राखीव )
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.