भिलवडी कृष्णाकाठावर दीपोत्सव -२०१९ उत्साहात साजरा
शब्दांकन : शशिकांत कांबळे / भिलवडी
चॅलेंजर्सची दिपोत्सवाची २५ वर्षाची परंपरा अविरतपणे सुरू..त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भिलवडी ता. पलूस येथे दिपोत्सव साजरा करण्यात आला. चॅलेंजर्स ग्रुप भिलवडीने दिपोत्सवाची २५ वर्षाची परंपरा अविरतपणे सुरू ठेवली असून, यावर्षीही दिपोत्सवामुळे कृष्णा घाट उजळून निघाला होता.
भिलवडी कृष्णा नदी तीरावर असणाऱ्या कृष्णा घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या घाटाची महती चिरंतर ठेवण्यामध्ये चॅलेंजर्स ग्रुप भिलवडीचे फार मोठे योगदान आहे. या घाटावरती दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपच्या वतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. दिपोत्सव त्याचाच एक भाग.. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भिलवडी येथील कृष्णा घाट हजारो दिपांनी उजळून निघाला होता. दिपोत्सवाचे नेत्रदिपक दृष्य पाहण्यासाठी अबाल, वृद्धांनी कृष्णाघाटावर गर्दी केली होती.
नयनरम्य दृष्य मोबाईलमध्ये चित्रीत करून, सेल्फी घेण्यासाठी तरूणाई आसुसली होती. कृष्णा नदी पुलावरून व घाटाच्या वावरीवरून दिपोत्सवाचे विलोभनीय दृष्य सर्वांनाच कृष्णा घाटाकडे आकर्षित करीत होते.
क्षणचित्रे :
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.