डी. वाय .पाटील अभियांत्रिकीमध्ये हॅकाथॉन -2023’ उत्साहात
कृष्णाकाठ न्यूज l दि. ३०/९/२०२३
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘हॅकाथॉन २०२३’ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयीन स्तरावरील या स्पर्धे मध्ये ८९ संघातील एकूण ५३४ स्पधर्कांनी घेतला. विविध समस्या सोडवण्याची संस्कृती रुजवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलने या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
या स्पर्धेचे उद्घाटन डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता यांच्या हस्ते झाले. इनोव्हेशन व स्टार्टअप हीच आजच्या काळाची गरज आहे. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हे जगातील एकमेव सर्वात मोठे ओपन इनोव्हेशन मॉडल आहे. विद्यार्थ्यांना केंद्र सरकार, मंत्रालय विभाग, उद्योग आणि इतर संस्थांना भेडसावणाऱ्या समस्यावर या व्यासपीठाद्वारे उपाय शोधता येतील, असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
या स्पर्धेसाठी पुणे येथील टेकनोवेल वेब सोल्युशन्सचे संचालक दिनेश कुडचे आणि बेंगळूरू येथील अफाइन सोल्युशन्सचे सदानंद होवाळ यांनी परीक्षण केले. एकूण 89 संघापैकी सर्वोत्तम 35 संघाची पुढील द्वितीय फेरी साठी निवड केली. कॅम्पस स्तरावरील विजेत्या संघातील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अंतिम फेरीत सहभागी होतील. हे संघ अंतिम फेरीत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत नोडल केंद्रावर दिलेल्या प्रॉब्लेमवर काम करतील. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांकाच्या टीमला केंद्र सरकारकडून प्रत्येक प्रोब्लेम सोल्व्हिंगसाठी एक लाख रुपये बक्षीस मिळणार आहे.
या हॅकाथॉन २०२३ चे नियोजन महाविद्यालयाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील, महाविद्यालयाचे इनोवेशन समन्वयक डॉ. प्रशांत जगताप आणि विविध विभागाचे शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन मिळाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.