Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

भिलवडीत उपक्रमशील शिक्षकाचे वाचनसंस्कृती संवर्धन

भिलवडीत उपक्रमशील शिक्षकाचे वाचनसंस्कृती संवर्धन


भिलवडी : ११/०१/२०२२ 

डिजीटल युगामध्ये ई-उपकरणांचा वाढता वापर वाचन संस्कृतीस मारक ठरत असल्याचे दिसून येत आहे.समाजातील सर्वच स्तरातील वाचक वर्ग कमी झाल्याची खंत नेहमीच ऐकावयास मिळते. परंतु या परिस्थितीतही वाचन संस्कृती जपण्याचे व वाढविण्याचे कार्य धनगाव-भिलवडी येथील उपक्रमशील शिक्षक शरद जाधव करीत आहेत.

पत्रकार दिनानिमित्त भिलवडी सार्वजनिक वाचनालय आयोजित पत्रकार सत्कार व चर्चासत्र दरम्यान सर्वांनी पत्रकारांनीही अधिकाधिक वाचन केले पाहिजे अस मत व्यक्त केले. त्याचवेळी पत्रकारांना त्यांनी स्वखर्चाने वर्गणी भरून सभासद करत अनोख्या पद्धतीने पत्रकार दिन साजरा केला.

ई-स्कूल टाईम्स, दि शरद शो यासह विविध शैक्षणिक पूरक उपक्रम ते  विद्यार्थी व समजाकरिता  सातत्याने राबवीत आहेत. भिलवडी सार्वजनिक वाचनालयाने त्यांच्या वाटचालीत मोलाची भूमिका पार पाडल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

या प्रवासात त्यांना जेष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून भावी काळात वाचनाचे बदललेले स्वरूप लक्षात घेत सर्वच प्रकारात वाचन संस्कृती अधिकाधिक ताकदीने जोपासण्याचा संकल्प त्यांनी जोपासला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.