Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

कर्तव्यनिष्ठ सेवा हेच राष्ट्रकार्य : ना.डॉ.विश्वजीत कदम

 प्रा.श्रीकृष्ण मोहिते सेवानिवृत्ती समारंभ संपन्न


सांगली l कृष्णाकाठ न्यूज

समर्पित सेवाभाव हा राष्ट्रउभारणी करिता महत्वाचा आहे असे प्रतिपादन कृषी व सहकार राज्यमंत्री ना.डॉ.विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले,प्रा.श्रीकृष्ण मोहिते यांचा सेवानिवृत्ती समारंभ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय,सांगली येथे उत्साहात संपन्न झाला.
विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतामधे प्रा.श्रीकृष्ण मोहिते यांच्या कर्तव्यनिष्ठेचा उल्लेख केला. त्यांचा प्रवास भावी पिढी करिता आदर्शवत असल्याचे प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे यांनी आवर्जून सांगितले.


सदर कार्यक्रम प्रसंगी आ.मोहनराव कदम,आ.विक्रम सावंत,भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक मा.डॉ.एच.एम.कदम,महाविद्यायाचे प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे,भारती बँकेचे संचालक मा.जितेश कदम,माजी जि.प.अध्यक्ष सौ.मालन मोहिते,सरपंच विजय मोहिते,डॉ.नितीन नायक,माजी नगरसेवक मा.हरीदास भाऊ पाटीलआदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तर महाविद्यालयातील प्राध्यापक,सेवक व स्नेहीजनांच्या साक्षीने पार पडला.

प्रा.सुर्यकांत बुरुंग यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.डॉ.प्रभा पाटील यांनी आभार व्यक्त केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.