पुणे ते तिरुपती बालाजी #११००+ कि.मी. चा धाडसी सायकलिंग प्रवास पूर्ण
अॅकॅडेमिक्ससह अॅथलेटिक्समध्ये एकत्र उंचीवर कार्यरत राहणं खरोखर कठीण आहे.पण हे अविश्वसनीय कॉम्बिनेशन साध्य करून दाखविले आहे भारती विद्यापीठ पुणे येथे कार्यरत आमचे फिटनेस मेंटॉर #प्रा.डॉ.सुहास मोहिते सर व त्यांच्या टीमने.
पुणे ते तिरुपती_बालाजी हा #1100+ km चा अविश्वसनीय सायकलिंगचा ६ दिवसांचा थक्क करणारा प्रवास नुकताच पूर्ण केला आहे.
डॉ. विश्वजीत कदम साहेबांचे सातत्याने मार्गदर्शन व तुमचे हे यश निश्चितच आपल्या भारती विद्यापीठ परिवारातील सर्वांना प्रेरणादायी असेच आहे.
डॉ. सुहास मोहिते सरांसोबत हा प्रवास पूर्ण करणारे श्री अरुण पवार सर आणि श्री उल्हास कदम सर यांचेही कौतुक करावे तितके कमीच आहे..!
हा आव्हानांनी भारलेला संस्मरणीय प्रवास पूर्ण केल्याबद्दल व संकल्पपूर्ती बद्दल कृष्णाकाठ परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा..!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.