Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

भारती विद्यापीठाच्या आधारस्तंभ : मा. विजयमाला कदम (वहिनीसाहेब ) - वाढदिवस विशेष


भारती विद्यापीठाच्या आधारस्तंभ : मा. विजयमाला कदम (वहिनीसाहेब )

कृष्णाकाठ न्यूज | दि. २/६/२०२३ 

 श्रीमती विजयमाला (वहिनीसाहेब) पतंगराव कदम यांचा जन्म २ जून १९५८ साली जत तालुक्यातील अचकनहळ्ळी गावामधील शिंदे राजघराण्यात झाला. आई या केवळ दोन अक्षरी शब्दात किती जादू आहे. आईच्या उदरी आपण जन्म घेतो आणि नवे जग पाहतो तीच आई आपल्या सुखदु:खात आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहते. जगात असे एकच न्यायालय आहे, जिथे सर्व गुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई, जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते ! वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई ! समाजाच्या मनात वहिनी साहेबांच्या कार्याबाबत कृतज्ञतेची आदराची भावना नेहमीच आम्हा सर्वांना जाणवत असते. समाजाला मंत्र दिलेला आहे. की न मावणारे दुःख नेहमीच जीवघेणे असते. कारण तुमचा जीव तेंव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो. त्या माणसाने दुःखापेक्षा मोठे व्हायचे ध्येय ठेवावे. भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला (वहिनीसाहेब) पतंगराव कदम हे नांव भारती विद्यापीठ या संस्थेच्या केंद्रस्थानी आहे. केवळ मा. साहेबांची पत्नी म्हणून नव्हे, तर ‘स्वतंत्र व्यक्तिमत्व लाभलेल्या वहिनीसाहेब’ यांनी प्रदीर्घ त्यागातुन स्वत:ची एक जागा निर्माण केली आहे.

डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांच्या बरोबर विवाहोत्तर सुरु झालेला संसार, हा कधीच केवळ एका ‘दाम्पत्याचा, पति-पत्नीचा संसार’ नव्हता.अगदी पहिल्या दिवसा पासून तो संसार व्यापक स्वरूपाचा, समाजाचा, आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचं सुख-दुःख हे आपलं मानून केलेला, इतरांच्या आनंदात आपला आनंद मानणारा, कुटुंबिय, नातेवाईक आणि भारती विद्यापीठ परिवारातील सदस्यांना आवश्यक तिथे आवश्यक ती ताकत प्रदान करणारा असाच होता. कोल्हापूरच्या एका जाणकार आणि अधिकारी व्यक्तिनं असं  सांगितलं होतं की ‘या मुलीच्या (वहिनीसाहेबांच्या) आयुष्यात आलेला ‘प्रत्येकजण’ विजयी होईल. तिचं उभं आयुष्य हीच विजयी आयुष्यांची एक मालिका असेल आणि काळाच्या ओघात आपलं ‘विजयमाला’ हे नाव ती सार्थ करील.” करवीरनिवासिनी आई जगदंबेच्या दारी; त्या कुण्या द्रष्टया पुरुषांन वर्तवलेलं ते भाकित आज सत्य होताना आपण अनुभवित आहोत.

भारती विद्यापीठ संस्था व्यापक करण्यात आणि विस्तारात साहेब अहोरात्र गुंतले होते. तहानभूक हरपून साहेब काम करीत होते, साहेबांची शिक्षण प्रसारासाठीची ही तळमळ पाहून घरची आघाडी पूर्णपणे वहिनीसाहेब स्वतः सांभाळायच्या, त्यासाठी खंबीर व्हायचे असा निर्णय वहिनीसाहेब यांनी घेतला. भांड्या-कुड्यांचा संसार सगळेच करतात एखादी गृहीनी संसाराकडून ज्या प्रकारच्या अपेक्षा ठेवते त्या अपेक्षा न ठेवता भारती विद्यापीठाच्या संसारात रमने अधिक पसंद केले. भारती विद्यापीठाची स्थापना होऊन जेमतेम दहा वर्षे झाली असतील तीन चार शाळा सुरू झाल्या होत्या संस्थेला आर्थिक पाठबळ नव्हते. अनेकांचे हात गोवर्धन उचलताना लागले आहे हे जितके खरे तितकेच त्या स्वप्नपूर्तीला वहिनीसाहेब यांच्या त्यागाचे अस्तर आहे हे ही तितकेच खरे आहे.

 आज साहेब आपल्यात जरी गेले असले तरी  साहेबांच्या कर्तुत्वाचा वसा घेऊन आ.डॉ विश्वजीत (बाळासाहेब) कदमसाहेब आणि आदरणीय वहिनीसाहेब तेवढ्याच ताकदीने साहेबांचा वसा पुढे चालवतआहेत. जनतेच्या हितासाठी साहेबांनी जे काम केले तेच काम आता बाळासाहेब करीत आहेत.समाजाच्या मनात वहिनी साहेबांच्या कार्याबाबत कृतज्ञतेची आदराची भावना नेहमीच सर्वांना जाणवत असते. प्रामाणिकपणे काम करा मी तुमच्या पाठीशी उभी आहे. वहिनीसाहेबांचे जीवन सामान्य स्त्रियांना नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

मानवी जीवनाला ज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. “दुसऱ्यावर अन्याय न करणे व स्वतःवरही अन्याय होऊ न देणे' यासाठी चांगल्या संस्काराची  गरज असते. सुरुवातीचे दिवस सत्त्वपरीक्षा पाहणारे होते. डॉ. पतंगरावजी कदम साहेबांचा लाडका ज्येष्ट पुत्र, वहिनी साहेबांच्या काळजाचा तुकडा काळाने आकस्मिक झडप घालून हिरावून नेला.अपत्यवियोगाची दु:खद घटना म्हणजे आईच्या काळजाचे तुकडे करणारा कठोर आघात. वहिनीसाहेब तर पूर्ण खचूनच गेल्या. अभिजीत च्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर हा मोठा आघातच होता. वहिनीसाहेब यांच्या डोळ्यातील पाणी हालत नव्हते.

भारती विद्यापीठाला आपले कुटुंब मानले त्यामुळे कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांची आपलेपणाने आणि कुटुंबप्रमुख या नात्याने नेहमीच काळजी घेतली. त्यांच्या अडीअडचणींच्या काळात वहिनीसाहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. संस्थेतल्या मुलांना जे शिक्षण मिळते तेच आपल्या मुलांना मिळाले पाहिजे असा आग्रह साहेब व वहिनीसाहेब यांचा होता, आ.डॉ. विश्वजीत  कदम साहेब डॉ.अस्मिता ताईंना नेहमीच स्फूर्ती दिली. आपल्या नावाप्रमाणे साहेबांच्या जीवनात विजया बनून राहिल्या, मा. सौ. स्वप्नालीताई यांच्या रुपाने भविष्यकाळाला आकार देणाऱ्या, ‘समर्थ; शालिन, सुसंस्कृत उच्चशिक्षित सुनबाई परिवारास मिळाल्या आहेत.साहेब रात्रंदिवस राजकारण, मतदार संघ, भारती विद्यापीठात मध्ये काम करीत होते.

साहेबांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात अनेकदा नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. असे प्रसंग येतात त्यावेळी साहेब काही क्षणच थोडेसे उदास व्हायचे, . डॉ. पतंगरावजी कदमसाहेब स्फूर्ती होते.

सासर माझी ताकद आहे. माहेर माझे संस्कार व प्रेम आहे.भारती परिवार व पलूस कडेगाव मतदारसंघ हीच माझी खरी ताकद आहे. सुख हा शब्द सापेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार सुख वेगवेगळे असते.

साहेब व वहीनीसाहेब यांनी आपले सुख गोरगरिबांच्या कल्याणात मानले आहे. त्यासाठी अहोरात्र कष्ट करीत राहिले. भारती विद्यापीठ व भारती बझार महाराष्ट्रात अग्रेसर आहे. साहेबांच्या आयुष्यातील संघर्ष आणि यशाने भरलेल्या वाटेवर  वहिनीसाहेब यांनी खंबीर साथ दिली.

भारती विद्यापीठामध्ये नियमांचे कडक पालन करून आपल्या  ग्रामीण भागातील मुला मुलींसाठी वहिनीसाहेब नेहमीच मार्गदर्शन करीत असतात.मुलीनी शिकून सवरून स्वावलंबी बनाव म्हणजे त्यांना स्त्री शक्तीची ओळख होईल असे ठाम मत वहिनीसाहेब नेहमीच आपल्या भाषणातून मांडतात, महीलांना समाजात स्वतंत्र ओळख मिळावी आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनावे, समाजात भरीव कामगिरी करणाऱ्या ग्रामीण महिलांचा सत्कार करण्यासाठी वहिनीसाहेब यांनी आपल्या सासूबाईंच्या स्मृतिप्रित्यर्थ "मातोश्री बयाबाई" ट्रस्ट ची स्थापना केली.

डॉ पतंगरावजी कदमसाहेब नावाच्या महात्म्याच्या पाठिशी वहिनीसाहेब हीच खरी ऊर्जा होती. सावीञीने आपल्या आसवांनी पदर भिजवून नवर्‍याचे काळीज ओले ठेवले. वहिनीसाहेबांनी सुद्धा तेच केले डोळ्यात तेल घालून डॉ पतंगरावजी कदम साहेबांना आजवर जपले होते.

आपल्या सार्वजनिक जीवनकार्यात संपूर्ण आयुष्य गुंतवून साहेबांचा संसार आणि घरप्रपंचा फुलवला तो या माऊलीने आजही साहेब आपल्यात नाहीत याचे दु:ख बाजूला ठेवून /सहनकरून साहेबांनी उभारलेल्या "ज्ञानवृक्षा"च्या संवर्धनासाठी काम करित आहेत.

भारती विद्यापीठाच्या माध्यमातून विशेष:ता कडेगाव येथे मातोश्री बयाबाई कदम कन्या महाविद्यालय तसेच मुलींची औद्योगिक प्रक्षिक्षण संस्था वस्तीगृह उभारण्यास वहिनीसाहेब यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांनी शैक्षणिक सिद्धांताला धरून शैक्षणिक कार्याची वाटचाल प्रभावीपणे व व्यापक स्वरूपात पुढे चालू ठेवली.

भारती विद्यापीठामध्ये शिक्षणाचा एक नवा प्रयोग चालू आहे. तो प्रयोग म्हणजे गोरगरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्या उपेक्षित, दलित व ग्रामीण भागातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिक्षण देणे.अशा तळागाळातील सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना जीवनांत ताठ मानेने उभा करणे हा एक मोठा प्रयोग आहे. कच्च्या मातीतून मूर्ती तयार करण्याचा हा प्रयोग आहे. त्यामागे ध्येयाबरोबरच साहेब आणि वहिनीसाहेब यांची अविचल श्रद्धा व निष्ठा आहे. वहिनीसाहेब व  बाळासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवा माणून निर्माण करण्याचा प्रयोग भारती विद्यापीठाच्या आवारात अखंडपणे चालू आहे. यातूनच पुढे नव्या दृष्टीचा, नव्या विचारांचा, नव्या युगाचा, नवा समाज निर्माण होणार आहे. भारती विद्यापीठाचा पन्नास वर्षाचा सोनेरी इतिहास घडला. त्याच्यासाठीच साहेबांना जगावं लागलं.

डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या सोबत असणाऱ्या वहिनीसाहेब साहेबांच्या सावली बनून उभ्या राहिल्या, सुख कमी आणि दुःख जास्त वाटून घेतल. आता त्यांच लेकरू विश्वजित आकाशाला गवसणी घालत आहेत.

एकेका बिंदूतून कष्टाचा सिंधू महासागर उभा राहिल्यावर... शब्दच नाही. किती गरीबांचे उमाळे आणि जिव्हाळे भारती विद्यापीठाच्या पाठीशी उभे आहेत.

भारती परिवार जनतेच्या शुभकार्यात मंडपाच्या दारात, अडीअडचणीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये, दुख:त दारी उभे, रक्तानात्याचा संबंध नसतानाही सेवकांचे /जनतेचे प्रेक्षक असतात. वहिनीसाहेब यांना आम्ही कधी रागावलेलं पाहिल नाही.  ममतेने जवळ घ्याव अशी त्यांची मुलं आणि पलूस-कडेगाव मतदारसंघ देशाला लाभलेला एक वरदान आहे.  कार्यक्षमता, गुणवत्ता यांचा आग्रह धरून प्रशासनाचा दर्जा उंचावणाऱ्या शिक्षणक्षेत्रातील ‘प्रभावी महिला पदाधिकारी' म्हणून वहिनीसाहेब सर्वपरिचित आहेत.  वहिनीसाहेब यांना 'प्रेमलता ताई चव्हाण पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. वहिनीसाहेब यांच्या शैक्षणिक,सामाजिक कार्याची दखल घेवुन अखिल भारतीय मराठा सेवा संघाने त्यांना "राजमाता जिजाऊ" पुरस्कार देवून गौरविण्यात आले. महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारा "रमाबाई रत्न पुरस्कार" देण्यात आला.

भारती विद्यापीठाच्या मातृत्वाची जबाबदारी वाहिनीसाहेबांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मी आहे ना " नको काळजी करु असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते. लोकोपयोगी कार्यात शक्य तेवढे वहिनीसाहेब यांचे योगदान फार मोठे आहे. पुरस्थीती, कोराना,अकाळीन संकट असो  वहिनीसाहेब  सावलीसारख्या उभ्या राहतात. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना कसा करायचा, एक गृहिणी म्हणून वहिनी साहेबांना अत्यंत चांगल्या पद्धतीने अवगत आहे.

साहेब गेल्यानंतर वहिनी साहेब यांची तब्येत साथ देत नाही. तरीही मोठ्या जिद्दीने कामकाज पाहतात, म्हणून आजही त्याच्याकडे पाहताना आमचा जीव कासावीस होतो.

वहिनीसाहेब यांनी आपल्या लेकराला, कुटुबांला भारती विद्यापीठासाठी मोठे योगदान दिले. पलूस-कडेगावच्या जनतेच्यासुद्धा फार मोठ्या आधारस्तंभ, आधार आहेत. पलूस-कडेगाव मतदारसंघात संकट कोणतेही असो कितीही मोठे असो कुटुंब प्रमुखाची भूमिका वहिनी साहेबांनी अत्यंत खंबीरपणे निभावली आहे व निभावत आहेत. अहोरात्र परिश्रम करणारी माया  लेकरं आपल्या तब्बेतीशी पर्वा न करता संपूर्ण आयुष्यच जनसेवेसाठी अर्पण केले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अत्यंत आपुलकीने चौकशी करत, मनोबल वाढवून प्रत्येक समस्येवर समाधानकारक तोडगा काढत आपल्या प्रशासकीय कार्यकुशलतेची चुणूक दाखवून देतात आणि भांबावलेले मन निर्धास्त होते.

!! कर्तव्यदक्ष गृहलक्ष्मी जिजाऊ तुम्ही!!  मातृरुपी जननी लक्ष्मीबाई तुम्ही!! धैर्यरुपी सामर्थ्यवान अहिंल्या तुम्ही!! शिक्षणरूपी सावित्री तुम्ही!!

                श्रीमती विजयमाला (वहिनीसाहेब) पतंगराव कदम, अध्यक्षा शालेय शिक्षण समिती भारती विद्यापीठ पुणे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !आई कुलस्वामी भवानी माता, उद्दगिरी आई आपणास उदंड व निरामय आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!

-

श्री. अरूण हिंदूराव सावंत
भिकवडी खुर्द, ता.कडेगांव जि सांगली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.