कृष्णाकाठ संस्थेचे उपक्रम प्रेरणादायी : डॉ.डी.जी.कणसे
सांगली – ११/०१/२०२२
सामाजिक क्षेत्रात कार्यरत कृष्णाकाठ फौंडेशन,भिलवडी-सांगली संस्थेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी व्यक्त केले.सातत्यपूर्ण ८ व्या वर्षी प्रकाशित होणाऱ्या कृष्णाकाठ दिनदर्शिका – २०२२ च्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते.
कृष्णाकाठ तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य , पूरग्रस्त भागात मदतकार्य, कोविड सेंटर करिता मदत त्याच सोबत कृष्णाकाठ दिनदर्शिका, ई-दिपावली अंक,कृष्णाकाठ न्यूज वेब पोर्टल आदी उपक्रम सातत्याने सुरु आहेत.
भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या प्रेरणेने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कृष्णाकाठ फौंडेशन तर्फे ना. डॉ. विश्वजीत कदम साहेब यांचे मार्गदर्शनाखाली विविध समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात असे संस्थापक-अध्यक्ष अमोल वंडे यांनी सांगितले.
_
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.