रुग्णाची सुरक्षा ही सामाजिक जबाबदारी - डीन डॉ. शहाजी देशमुख
सांगली:
रूग्णाची सुरक्षा म्हणजे त्याला रोगापासून प्रतिबंधित करणे आणि त्याला दूर ठेवणे. सुरक्षा करणे, काळजी घेणे हे केवळ हेल्थ केअर वर्करच्या शिक्षणाची बाब नसून ती समाजाची बाब असल्याचे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. शहाजी देशमुख यांनी केले.
येथील भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक रूग्ण सुरक्षा दिवस संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी, डेप्युटी डीन डॉ. सुनिल पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पोस्टर प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कशाप्रकारच्या यंत्रणा आहेत. त्या कशा राबवल्या जातात. याची सविस्तर माहिती देण्यात आली.
डॉ. सुनिल पाटील म्हणाले, सुरक्षा ही प्रत्येकाच्या अंगवळणी पडली पाहिजे. सुरक्षा ही फक्त नियम नसुन सवय आहे. सर्वांनी ही सवय अंगी बानवली पाहिजे. म्हणजे समाज आणि देश सुरक्षित राहील. सर्वांची सुरक्षितता ही माझी जबाबदारी आहे. ही विचारधारा सर्वांनी बाळगण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.
रूग्णाने औषध घेतल्यानंतर त्याचा काय परिणाम झाला का जर झाला असेल तर काय उपचार पद्धती सुरू करावी यांसह शाळेतील मुलांची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी हे पोस्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आले. सुरक्षितता हाच खरा जीवनाचा अर्थ सुरक्षिततेविना आहे सर्व व्यर्थ असा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला.
दरम्यान १३-१७ सप्टेंबर २०२१ या आठवडाभर चालणाऱ्या सप्ताहात भाषण, पथनाट्य या स्पर्धा भरवण्यात आल्या. यामध्ये नर्सिंग, हाऊसकीपिंग यांनी सहभाग नोंदवला होता. अशी माहिती एनएबीएच कोऑर्डीनेटर डॉ. राजर्षी वायदंडे यांनी दिली.
सुरक्षा अधिकारी अजिंक्य पाटील, आशिष मोहिते, ऋषीकेश शिंदे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, डॉक्टर, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ. राजर्षी वायदंडे यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.