Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

भारती हॉस्पिटलमध्ये फिजीओथेरपी सप्ताहाची सांगता - विविध उपक्रम संपन्न

भारती हॉस्पिटलमध्ये फिजीओथेरपी सप्ताहाची सांगता - विविध उपक्रम संपन्न

सांगली |  ११/०९/२०२१ 


येथील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात जागतिक फिजीओथेरपी सप्ताह उत्साहात संपन्न झाला. फिजीओथेरपी विभागामार्फत ३ ते ८ सप्टेंबर २०२१ याचे आयोजन केले होते. या उपक्रमाचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.


उद्घाटन भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम यांच्याहस्ते झाले. लॉंग कोविड, बालरोग, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर, मणक्यांचे आजार व त्यांच्या उपचार पद्धतीची माहिती उत्तमरित्या नागरिकांपर्यंत पोचवण्यात आली.

८ सप्टेंबर या मुख्य दिवशी अर्धांगवायू पुनर्वसन क्लिनिकचे उद्घाटन डीन डॉ. शहाजी देशमुख झाले असल्याची माहिती डॉ. मनाल अंतिकाट यांनी दिली.

बोगस किंवा पात्रता नसलेल्या फिजीओथेरपीस्टकडून उपचार घेतल्याने काय धोके निर्माण होतात याची माहिती डॉ. सचिन शेट्टी यांनी दिली. नागरिकांना सावध राहण्याच्या सुचना दिल्या. डॉ. स्नेहा कटके यांनी जनतेला आवाहन केले की, महाराष्ट्र राज्य ऑक्युपेशनल थेरेपी व फिजीओथेरपी कौन्सिल मार्फत नोंदणी धारक फिजीओथेरपीस्ट यांच्याकडूनच उपचार करुन घ्यावेत.

कार्यक्रमास  डीन डॉ. शहाजी देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, डॉ. सुनील पाटील, डॉ. स्नेहा कटके, डॉ. सचिन शेट्टी तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.