Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व : प्रा.श्रीकृष्ण मोहिते

शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व : प्रा.श्रीकृष्ण मोहिते 

-  प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
सदस्य, व्यवस्थापन परिषद, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

आर्थिक संपन्नतेऐवजी वर्षानुवर्षे समाजाच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरेल असा वारसा निर्माण करणारा भारती विद्यापीठ परिवार. एक अत्यंत अभ्यासू,  विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय याबरोबरच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे शिक्षक म्हणून भारती विद्यापीठातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात परिचित असणारे प्रा.श्रीकृष्ण मोहिते यांचे नाव घेता येईल.  आपण ज्या शिक्षण संस्थेत कार्यरत असतो त्या संस्थेवर प्रचंड निष्ठा कशी असावी हे प्रा.श्रीकृष्ण मोहिते यांच्या कडून घेण्यासारखे आहे.

भारती विद्यापीठावर प्रचंड निष्ठा असणाऱ्या प्रा.श्रीकृष्ण मोहिते यांचे भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती डॉ. पतंगराव कदम साहेब आणि आ. मोहनराव कदम (शेठ) यांच्या सहित संपूर्ण कदम कुटुंबियांवर अपार प्रेम आहे. आमच्या सांगलीतील  भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे प्रमुख म्हणून प्रा.श्रीकृष्ण मोहिते यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

अध्यापन कार्याबरोबरच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहणारे शिक्षकांनाच समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होते. त्यापैकी प्रा.श्रीकृष्ण मोहिते हे एक आहेत. भारती विद्यापीठाच्या ग्रामीण विकास प्रतिष्ठान मार्फत अनेक सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम त्यांनी राबविले आहेत.

समाजातील अनेक नामवंत संस्थांनी प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांच्या  सामाजिक कार्याची नोंद घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर समाजाच्या जडणघडणीत कृतिशील योगदान देणाऱ्या शिक्षकांचे समाज कृतज्ञता पूर्वक स्मरण करीत असतो यांची प्रचिती  प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराने होते.
आयुष्याच्या प्रवासात जी काही चांगली माणसं भारती विद्यापीठ परिवारात भेटली त्यामध्ये प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.त्यांच्या भावी प्रवासाकरिता मन:पूर्वक शुभेच्छा..!



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.