Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

भिलवडीत कृष्णाकाठ संस्थेतर्फे जि.प.विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन


भिलवडीत कृष्णाकाठ संस्थेतर्फे जि.प.विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहनभिलवडी | ३/२/२०२०

जिल्हा परिषद शाळा,भिलवडी मार्फत सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार शिक्षण व भौतिक सुविधा देण्यासाठी मुख्याध्यापक श्री.अशोक कोळेकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कार्यरत असणा-या कृष्णाकाठ सोशल फौंडेशन,भिलवडी संस्थेतर्फे २ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेण्यात आले.

खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या काळात काही वर्षापूर्वी शेकडो विद्यार्थी असणारी जि.प.शाळा अगदी ३५ च्या पटावर आली होती त्यानंतर मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे ७५ विद्यार्थी आज शिक्षण घेत असून येणाऱ्या शैक्षणिक वर्षात १०० हून अधिक प्रवेशाचे लक्ष आहे.

शाळेचा विविध गुणदर्शन कार्यक्रम नुकताच ग्रा.पं.भिलवडी च्या प्रांगणात पार पडला, विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून उपस्थित ग्रामस्थांनी शाळेला गतवैभव प्राप्त होत असल्याची प्रतिकिया देत समाधान व्यक्त केले.या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनी मुख्याध्यापकांनी केलेल्या  विद्यार्थी दत्तक आवाहनाला प्रतिसाद देत समाजातील विविध मान्यवरांनी मदत देऊ केली आहे. त्यावेळेस उत्कृष्ट कार्य बद्दल त्यांचा सत्कार सरपंच श्री.विजय चोपडे यांच्या हस्ते करण्यात आला.

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी व जागरूक ग्रामस्थांनी अधिकाधिक विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या दत्तक  घेत मदत उपलब्ध करून देण्याचे आवाहन कृष्णाकाठ सोशल फौंडेशन,भिलवडी चे अध्यक्ष अमोल वंडे यांनी केले आहे.सदर शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे.

-------------
RBL BANK Bhilawadi : Krushnakath Foundation,Bhilawadi.
Account Number:  409000446841
IFSC Code    : RATN0000014

Phone /Google Pay - 9890 546 909

आपण संस्थेमार्फत मदत करु शकता । आभारपत्र व रिसीट देण्यात येईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.