आधुनिक युगातील चौफेर नेतृत्व - मा.ना.डॉ.विश्वजित कदम
- डॉ.डी.जी.कणसे
प्राचार्य, भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय,सांगली
समाजातील माणसे आणि सर्वसामान्य माणसांचा समाज त्यांच्या मूलभूत गरजा, युवक-युवतींची सद्यस्थिती,भविष्यासाठी तयारी,उच्च शिक्षण व संशोधन,क्रिडा क्षेत्रातील गुणात्मक वाढ या सगळयांशी जोडल्या गेलेल्या नात्यांची वीणा ज्यांच्या खांद्यावर आहे असे महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री, भारती विद्यापीठाचे कार्यवाह, मा.ना.डॉ.विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित शब्दसुमनांची शुभेच्छा !
महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात तसेच अर्थकारणात सांगली जिल्हा सातत्याने वरचढ ठरला आहे. वसंतदादा पाटील,डॉ.पतंगराव कदम यांच्यासारखे राजकीय धुरंधर सांगली जिल्हयात घडले. त्यांनी सांगली पासून दिल्लीपर्यंतचा सगळा इतिहास घडविला. महाराष्ट्राचा दबदबा वाढविला. त्यामुळे साहजिकच नव्या पिढीला राजकारणाचे बाळकडू मिळत गेले. विद्यमान परिस्थितीत मा.डॉ.पतंगराव कदम यांनी शिक्षण, सहकार, राजकारण,समाजकारण यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये देदीप्यमान कामगिरी करुन महाराष्ट्राला एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवले. अथपासून इतिपर्यंतचा त्यांचा हा जीवनप्रवास खरंतर परखड अनुभवातून आविष्कृत झाला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ग्रामीण जनतेचा कणा असणारे मा.मोहनराव कदम यांच्याकडून उज्ज्वल भविष्याची प्रेरणा घेत आणि स्वकर्तृत्वाचा मेळ घालत मा.बाळासाहेब तथा विश्वजित कदम यांनी आपल्या राजकीय,शैक्षणिक आणि सामाजिक कायाची दमदार वाटचाल सुरु केलेली आहे. उभरत्या वयामध्ये चौफेर कामगिरी करणाऱ्या बाळासाहेबांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रिडा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सुरु केलेले काम पाहिले की याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.
महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री, कार्यवाह-भारती विद्यापीठ, अध्यक्ष-बालगंधर्व स्मारक समिती नागठाणे, उपाध्यक्ष,भारती सहकारी बँक लि. पुणे, संचालक -सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि. वांगी, संचालक- सागरेश्वर सहकारी सूतगिरणी मर्या.कडेगांव, अध्यक्ष दक्षिण भारत फुटबॉल असोसिएशन, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक
काँग्रेस अशा कितीतरी जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारे हे युवा नेतृत्व आज अनेकांच्या कुतूहलाचा विषय बनले आहे. मा.बाळासाहेबांच्या कामाचा आवाका पाहिला, वाडयावस्त्यांपासून महानगरापर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत विखुरलेले त्यांचे मित्र, चाहते, हितचिंतक, अनुयायी, शिलेदार पाहिले की याची साक्ष पटते.
"जे आहे ते समाजाचे नि जे करावयाचे ते समाजासाठीच" या समर्पित भावनेने आपल्या पित्याप्रमाणेच या युवानेत्यानेही मार्गक्रमण सुरु केले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोरगरिबांची कामे आणि गरजू लोकांना मदत करताना वेळेचे बंधन पाळत नाहीत. नैसर्गिक आपत्तीच्या काळात नेतृत्वाचा खरा कस लागत असतो.सांगली जिल्हयात २०१९ ला कृष्णा नदीला आलेल्या महापूराने थैमान घातले होते. त्या महापूराचा फटका पलूस ताल्रुक्याला ही मोठया प्रमाणात बसला. परंतु पलूस -कडेगांव आमदार यापेक्षाही एक मुलगा,एक भाऊ या नात्याने त्यांनी पूरग्रस्तांसाठी आहोरात्र केलेल्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. महापूर असो वा राज्यात पडलेला दुष्काळ असो या नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहणे,तातडीने छावणींची उभारणी करणे, पुनर्वसनाचे काम, शासकीय मदत सवापर्यंत पोहचविण्यामध्ये मा.बाळासाहेबांनी सिंहाचा वाटा उचललेला होता. प्रसन्न मुद्रा, मृदूवाणी असलेले आणि कामाचा प्रचंड आवाका डॉ.विशवजित कदम गरिबांपासून श्रीमंतापर्यंत व लहानापासून थोरापर्यंत सर्वाचे लाडके आहे. महापूराच्या वेळी केलेल्या धाडसातून एक धाडसी, सर्वगुणसंपन्न युवा नेता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रालाच काय पण संपूर्ण भारताला ही झाली आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती डॉ.पतंगराव कदम व सौ.विजयमाला कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांनी शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक व राजकीय अशा क्षेत्रांत भरीव कामगिरी करीत असताना युवकांच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले. स्त्रीभ्रूणहत्या विरोधात 'मुलगी वाचवा' अभियान सुरु केले. गेल्या १२ वर्षापासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून ते राज्यभर कार्यरत आहेत.त्यांच्या कायीची पावती म्हणूनच त्यांना महाराष्ट्राच्या युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद मिळाले.
८डिसेंबर २००६ पासून मा.साहेबांनी त्यांच्यावर भारती विद्यापीठाच्या कार्यवाहपदाची जबाबदारी टाकली. कार्यवाहपद स्वीकारल्यापासून आपल्या कामाची झलक अनेक यशस्वी कार्यक्रमांमधून त्यांनी दाखवली आहे. त्यांनी घेतलेल्या सेवक व प्राचार्य यांच्या बैठकांमध्ये “काका शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण काम करणार आहोत.” असे जे त्यांनी सांगितले होते,त्याची पदोपदी प्रचिती येत आहे. या संस्थेच्या एका शाखेचा प्रमुख या नात्याने काम करताना वेळोवेळी प्रशासकीय मार्गदर्शनाची गरज भासते.त्यावेळी विश्वजित यांनी क्षणाधीत निर्णय व अचूकपणे केलेले मार्गदर्शन माझ्यासारख्यांना मोहरुन टाकते. प्राचायींच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या सूचना शिक्षणक्षेत्रातील मुरब्बी माणसासारख्या असतात. भारती विद्यापीठामध्ये 'हायटेक मॅनेजमेंट सिस्टीम' राबविणारे मा.बाळासाहेब हे २१ व्या शतकातील शिल्पकार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.महाविद्यालयातील अध्ययनाबरोबरच संशोधनावर अधिक भर द्यावा,याविषयी ते आग्रही असतात. लहानपणापासूनचे डॉ.विश्वजित यांना खेळाची खूप आवड आहे. त्यांचे बंधू अभिजित दादांना फुटबॉल जीव की प्राण वाटायचा. ही आवड बाळासाहेबांनी मन:पूर्वक जोपासली आहे. आपल्या बंधूंची स्मृती चिरंतन राहावी म्हणून त्यांनी 'अभिजित कदम फुटबॉल असोसिएशन' ची स्थापना केली. या 'असोसिएशन' माफत दरवर्षी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात. डॉ.विश्वजित यांची अविरत धडपड पाहून देशपातळीवरील 'फुटबॉल असोसिएशन' चे अध्यक्षपदही निर्विवादपणे त्यांच्याकडे चालून आले आहे. कुस्ती या पारंपारिक खेळाची गोडी वाढावी तरुणांचा सहभाग वाढावा,यासाठी त्यांनी कुस्तीकडेही विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणाच्या कुस्ती स्पर्धाना त्यांची आवर्जुन उपस्थिती असते. कुस्तीची परंपरा जतन करण्यासाठी कडेगांव येथे अभिजित कदम कुस्ती संकुल नावाचे अद्ययावत केंद्र त्यांनी उभारले आहे.त्यामुळे ग्रामीण परिसरात कुस्ती कलावंताना या केंद्राचा लाभ घडणार आहे. मा.ना.डॉ.विश्वजित कदम हे पलूस -कडेगांव विधानसभा मतदार संघातून १,६२,५२१ इतक्या उच्चांकी मतांनी निवडून आले आहे.त्यानी राज्य पातळीवर युवक काँग्रेसचे माध्यमातून उठावदार काम केले आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ.पतंगराव कदम यांच्या पावलावर पाऊल ठेवत डॉ.विश्वजित कदम यांनी शिक्षण,सामाजिक,सहकार,राजकीय क्षेत्रात काम सुरु ठेवले आहे.महापुरावेळी त्यांनी आहोरात्र काम केले आहे. नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कृषी,सहकार,सामाजिक न्याय,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,अल्पसंख्याक विकास व औकाफ,मराठी भाषा या खात्याच्या राज्यमंत्रीपदी निवड झाली आहे. उतम संस्काराची शिदोरी ज्यांना लाभते ते खरेच भाग्यवान असतात. त्यादृष्टीनेही बाळासाहेब भाग्यवान आहेत. दिग्विजयी पिता मा. डॉ.पतंगरावजी कदम यांच्या आदशाची वीणा खांद्यावर बाळगून जगाच्या कल्याणासाठी नव्या शतकाचा पुरोगामी वेध घेत दमदारपणे बाळासाहेबांची यशस्वी वाटचाल सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये युवक काँग्रेसमधील कर्तृत्ववान उमेदवारांची मते, सूचना लक्षात घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य बाळासाहेबांकडे आहे.
झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ पाहत रहावा,कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा..तुमच्या भावी वाटचालीस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.