(कृष्णाकाठ न्यूज )
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. मात्र, ३० सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील.
२०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. लक्षणीय बाब म्हणजे आता २००० च्या नोटांची छपाई बंद होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.